चालकविरहित मेट्राे ऑक्टाेबरमध्ये धावणार; MMRDA चा दावा, कमाल वेग मर्यादा ८० किमी प्रति तास

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 07:05 AM2021-05-16T07:05:36+5:302021-05-16T07:06:21+5:30

पश्चिम उपनगरातील २ अ, ७ चे काम अंतिम टप्प्यात

The driverless metro will run in October; MMRDA claims | चालकविरहित मेट्राे ऑक्टाेबरमध्ये धावणार; MMRDA चा दावा, कमाल वेग मर्यादा ८० किमी प्रति तास

चालकविरहित मेट्राे ऑक्टाेबरमध्ये धावणार; MMRDA चा दावा, कमाल वेग मर्यादा ८० किमी प्रति तास

Next

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरात मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ या दोन्ही मेट्रोची कामे वेगाने पूर्ण होत असून, या दोन्ही मेट्रो लाईन येत्या ऑक्टोबर महिन्यात सुरू होतील, असा दावा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) केला आहे. या मेट्राेचे वैशिष्ट्य म्हणजे ती चालकविरहित असेल.

मे महिन्यात मेट्रोच्या चाचण्या होतील. दोन वर्षांपासून कोरोनामुळे कामात अडचणी येत आहेत. कामगार कमी आहेत. मात्र, याचा कामावर परिणाम झालेला नाही. २०१६ साली या प्रकल्पाचे काम सुरू झाले होते. पाच वर्षांत ते पूर्ण होत आहे. वर्षाच्या शेवटी मेट्रोच्या दोन्ही लाईन सुरू होतील, असा आशावाद प्राधिकरणाने व्यक्त केला.

मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ या दोन्ही मेट्रो सुरू झाल्यानंतर अंधेरी ते दहिसर पट्ट्यातील १३ लाख प्रवासी या सेवेचा लाभ घेऊ शकतील. २०२६ पर्यंत मुंबईतील मेट्रो मार्गांचे काम पूर्ण करण्याचे प्रस्तावित असून त्यामुळे मुंबई महानगर प्रदेश परिसरात वर्तुळाकार मेट्रो मार्ग तयार होतील. साधारणत: २०३१ पर्यंत १ कोटी प्रवासी मेट्रोने प्रवास करतील, असा अंदाज आहे.

दरम्यान,  सीसीटीव्ही कॅमेरा,  प्रत्येक डब्यात वातानुकूलित यंत्रणा, स्वयंचलित दरवाजे असलेल्या मुंबई मेट्रोची प्रत्येक ट्रेन ६ कोचची आहे. कोचमध्ये ५२ प्रवाशांची बसण्याची तसेच ३२८ प्रवाशांना उभे राहण्याची व्यवस्था आहे. एका डब्यात ३८० जणांचा प्रवास शक्य आहे. एका ट्रेनची प्रवासी क्षमता २,२८० आहे.

मुंबई मेट्रोची प्रत्येक ट्रेन ६ कोचची आहे. एका डब्यात ३८० जणांचा प्रवास शक्य आहे. एका ट्रेनची प्रवासी क्षमता २,२८० आहे. मेट्रो कोच एसी असून दरवाजे स्वयंचलित आहेत. प्रवाशांच्या मदतीला डब्यात स्विच आहे. ऊर्जा संवर्धनाला प्राधान्य देण्यात आले आहे.

वैशिष्ट्ये
चालकविरहित ट्रेन
कमाल वेग मर्यादा ८० किमी प्रति तास
ऊर्जा वाचविणारी पुनरुत्पादक ब्रेक सिस्टीम
प्रत्येक बाजूला चार दरवाजांची स्टेनलेस स्टील बॉडी
प्रत्येक डब्यात दाेन सायकल ठेवण्याची व्यवस्था, त्यामुळे सायकलसह प्रवास करणे शक्य
इंटरनेटसाठी ऑप्टिकल फायबरचे नेटवर्क

 

Web Title: The driverless metro will run in October; MMRDA claims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.