मेरु कंपनीविरोधात चालकांची याचिका
By admin | Published: July 10, 2015 11:13 PM
मेरु कंपनीविरोधात चालकांची याचिका
मेरु कंपनीविरोधात चालकांची याचिकामुंबई: मेरु टॅक्सी सेवेविरोधात त्याच्या चालकांनीच उच्च न्यायालयात याचिका केली आहे. कंपनीने सुरूवातीला चालकांकडून ७० हजार रूपये घेतले व दर दिवसाला कंपनी चालकांकडून १०६० रूपये घेते. हे पैसे न दिल्यास दंडही ठोठावते. तसेच चालकांना ३६५ दिवस काम करावे लागते. हे गैर असून कंपनी चालकांची पिळवणूक करत आहे, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. याची दखल घेत न्यायालयाने याचे प्रत्युत्तर सादर करण्याचे आदेश कंपनीला दिले आहेत.