प्रशिक्षणाच्या नावाखाली संशयित अतिरेक्यांच्या चालायच्या बैठका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2019 04:51 AM2019-01-26T04:51:35+5:302019-01-26T04:51:46+5:30

राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटक केलेल्या मोहसीन सिराजउद्दिन खान (२०) याचा धाकटा भाऊ फुटबॉलपटू होता.

Driving meetings of suspected terrorists in the name of training | प्रशिक्षणाच्या नावाखाली संशयित अतिरेक्यांच्या चालायच्या बैठका

प्रशिक्षणाच्या नावाखाली संशयित अतिरेक्यांच्या चालायच्या बैठका

Next

मुंबई : राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटक केलेल्या मोहसीन सिराजउद्दिन खान (२०) याचा धाकटा भाऊ फुटबॉलपटू होता. मुंब्रासह कुर्ला येथे तो एका क्लबमध्ये प्रशिक्षक होता. याच क्लबमध्ये अन्य संशयित अतिरेकी प्रशिक्षणासाठी यायचे. प्रशिक्षणाच्या नावाखाली त्यांच्यात कटाची आखणी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
एटीएसने केलेल्या कारवाईत मोहसीनसह त्याचा भाऊ सलमान खान आणि धाकटा मोहम्मद तकी उर्फ अबु खालीद सिराजुद्दिन खान (२०) हा फुटबॉलपटू आहे. तो मुंब्रासह कुर्ला येथे एका क्लबमध्ये प्रशिक्षक होता. अटक केलेला गट प्रशिक्षणाच्या निमित्ताने येथे एकमेकांना भेटून चर्चा करत असे. यामध्ये क्लबमधील अन्य काही तरुणांचे माथी भडकविण्याचा प्रयत्न झाला आहे का? या दिशेनेही एटीएस तपास करत आहेत.
मुंबईसह मुंब्रा, औरंगाबादमधील संशयितांकडे एटीएस कसून चौकशी करत आहेत. काहींना चौकशीसाठी त्यांनी ताब्यात घेतल्याचे समजते. त्यामुळे येत्या काळात अटकेचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
>अतिरेक्यांशी संबंध नाहीत - पीएफआय
मुंब्रा आणि औरंगाबादमधून अटक केलेल्या संशयित अतिरेक्यांसोबत विनाकारण पॉप्युलर फ्रंट आॅफ इंडियाच्या (पीएफआय) औरंगाबाद शाखेचे नाव जोडले जात आहे. अटक गटाशी संस्थेचा काहीही संबंध नसल्याचा दावा पीआयएफचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष युसुफ सादात यांनी केला आहे.

Web Title: Driving meetings of suspected terrorists in the name of training

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.