लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत दहशवादी हल्ल्याच्या शक्यतेतून मुंबई पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून शहरात २९ डिसेंबरपर्यंत ड्रोनसदृश उपकरणांच्या उड्डाणावर बंदी घातली आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कलम १८८ अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.
देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई कायम दहशतवाद्यांच्या टार्गेटवर आहे. मुंबईतील मंदिरे, गर्दीची ठिकाणे ही दहशतवाद्यांच्या सॉफ्ट टार्गेटवर आहे. याआधीही मुंबईत घातपात घडवण्याचा इशारा देण्यात आला होता. खबरदारीचा उपाय म्हणून २९ डिसेंबरपर्यंत ड्रोन, रिमोटवर चालणारी छोटी विमाने, पॅराग्लायडिंगवर बंदी घालण्यात आली आहे. हे नियमित आदेश असून, नागरिकांनी आदेशांचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांकड़ून करण्यात आले आहे.