धोबीघाट परिसरात ड्रोनद्वारे कीटकनाशक फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:07 AM2021-09-07T04:07:02+5:302021-09-07T04:07:02+5:30

मुंबई - परळ येथील गिरण परिसरातील डासांची उत्पत्तीस्थाने ड्रोनद्वारे नष्ट करण्यात आली. ही मोहीम फत्ते झाल्यानंतर आता महालक्ष्मी धोबीघाट ...

Drone spraying of pesticides in Dhobighat area | धोबीघाट परिसरात ड्रोनद्वारे कीटकनाशक फवारणी

धोबीघाट परिसरात ड्रोनद्वारे कीटकनाशक फवारणी

Next

मुंबई - परळ येथील गिरण परिसरातील डासांची उत्पत्तीस्थाने ड्रोनद्वारे नष्ट करण्यात आली. ही मोहीम फत्ते झाल्यानंतर आता महालक्ष्मी धोबीघाट येथील मलेरिया व डेंग्यूची उत्पत्तीस्थाने नष्ट करण्यासाठी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या उपस्थितीत सकाळी ड्रोनद्वारे कीटकनाशक फवारणी करण्यात आली.

जुन्या व धोकादायक ठरलेल्या गिरण्यांवर चढून कीटकनाशक फवारणी करणे पालिकेला शक्य होत नाही. त्यामुळे ड्रोनद्वारे फवारणी करण्याचा प्रयोग यंदा करण्यात आला. त्यानंतर सोमवारी महालक्ष्मी धोबीघाट येथील नागरिकांच्या घराच्या छतांवर ड्रोनद्वारे फवारणी करण्यात आली. वरळी, प्रभादेवी, लोअर परळ या भागांमध्ये ड्रोनद्वारे फवारणी करण्यात येणार आहे. प्रत्येक वाॅर्डाला एक ड्रोन देण्याची मागणी नगरसेवकांनी केली असल्याचे महापौरांनी यावेळी सांगितले.

अशी घ्या काळजी

घरातील शोभिवंत कुंड्यांची तावदाने, वातानुकूलित यंत्रणांमधील टाक्यांमध्ये पाणी साचून राहणार नाही याबाबत नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे महापौरांनी निदर्शनास आणले.

येथे तयार होतात डासांचे अड्डे

जी दक्षिण विभागामध्ये सीएसआरमधून ड्रोन खरेदी करण्यात आले आहे. त्याची अंदाजे किंमत साडेसात लाख रुपयांपर्यंत आहे. या विभागामध्ये मोठ्या प्रमाणात मोडकळीस आलेल्या गिरण्या, लोअर परेल रेल्वे वर्कशॉपच्या ठिकाणी असणारे रूफ गटर, झोपडपट्टीच्या वरील भागात ठेवण्यात आलेल्या ताडपत्री आहेत. अशा ठिकाणी पावसाळ्यामध्ये पाणी साचून मलेरिया वाहक डासांची उत्पत्ती होत असते.

यासाठी ड्रोनचा वापर

अशा ठिकाणी पाहणी करून अळीनाशक फवारणी करण्याकरिता कीटक नियंत्रण खात्याच्या कर्मचाऱ्यांना पोहोचता येत नाही. परिणामी, अशा ठिकाणी डासांची उत्पत्ती होऊन मलेरिया रुग्णांमध्ये वाढ होते. त्यामुळे ड्रोनच्या साह्याने जून-२०२१ पासून या ठिकाणी कीटकनाशक फवारणी करण्यात येत आहे. या ड्रोनची टँक क्षमता दहा लिटर व बॅटरीची क्षमता अर्धा तास आहे. हा ड्रोन उडविण्यासाठी थिंक केअर कंपनीची मदत घेऊन प्रशिक्षित पायलटद्वारे ड्रोन उडविले जात आहे.

रुग्णसंख्येत घट

या विभागात ६८९ एवढे मलेरियावाहक डास उत्पत्तीस्थाने शोधून नष्ट करण्यात आली. परिणामी, गेल्या वर्षी जून ते ऑगस्ट २०२० मध्ये ९०० मलेरिया रुग्ण सापडले होते. यावर्षी जून ते ऑगस्ट काळात ४७४ मलेरिया रुग्ण सापडले आहेत.

Web Title: Drone spraying of pesticides in Dhobighat area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.