आयआयटी मुंबईच्या टेकफेस्टमध्ये रोबोवॉर इतकीच गाजत होती ती इतर रोबोट्सची झुंज. प्रत्येक तंत्रवेडा विद्यार्थी आपला रोबो आणि त्याला कंट्रोल करणारा माउस घेऊनच मैदानात उतरला होता. प्रत्येकाचा रोबो हा दुसऱ्या रोबोला कशी टक्कर देईल आणि शेवटपर्यंत कसा टिकून राहील, यासाठीची रोमांचक चढाओढ यावेळी पाहायला मिळाली.रोबोवॉर, फुल्ल थ्रोटल, कार रेसिंग यांच्यासोबतच तरुणाईला आकर्षित करत होते, ते म्हणजे हवेत स्पर्धा करणारे ड्रोन आणि त्यांची स्पर्धा. वरती पंखा आणि चार्जिंगच्या साहाय्याने रिमोट कंट्रोलने हवेत तोल संभाळणारे ड्रोन प्रत्येकाचेच लक्ष वेधून घेत होते. त्याला कंट्रोल करणारे स्पर्धकही ड्रोन उडविताना तेवढेच एकाग्र आणि मग्न झालेले दिसत होते.तंत्रज्ञानाच्या या ५ जानेवारी म्हणजे आजपर्यंत चालणाºया कुंभमेळ्यात महिला सबलीकरणा संदेशही देण्यात आला. ‘लिली, द स्ट्रीट आर्ट’ने भिंतीवर वुमन रोबोट साकारून महिला सबलीकरणाचा संदेश टेकफेस्टच्या माध्यमातून दिला. विशेष म्हणजे, टेकफेस्टच्या आयोजकांनी स्पेनच्या या कलाकाराला तिच्या कलाकृती इंस्टाग्रामवर पाहून आमंत्रित केले. ‘मिरिया’ हे नाव असलेल्या स्पेनच्या कलाकाराची कलाकृती टेकफेस्टचे विशेष आकर्षण ठरत आहे.
टेकफेस्टमध्ये ड्रोन, रोबो वॉरचा थरार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2020 5:18 AM