नागरिकांच्या भटकंतीवर आता ड्रोनचा वॉच

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2020 06:50 AM2020-04-05T06:50:00+5:302020-04-05T06:50:17+5:30

सर्व आयुक्तालयांना वाटप :गर्दीची ठिकाणे व नाक्यांवर विशेष नजर

Drone Watch Now On Citizens Wandering | नागरिकांच्या भटकंतीवर आता ड्रोनचा वॉच

नागरिकांच्या भटकंतीवर आता ड्रोनचा वॉच

Next

जमीर काझी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाचे राज्यातील थैमान नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाकडून युध्दस्तरावर प्रयत्न सुरू असताना नागरिकांची मनमानी वर्तणूक त्यात अडसर ठरत आहे. विनाकारण रस्त्यावर जमावाने फिरणाऱ्यांचे प्रमाण कायम राहिल्याने करोनाबाधिताचा आकडा वाढत राहिला आहे. त्यांच्यावर आता ड्रोनच्या साहाय्याने कारवाई करून चाप लावला जात आहे़ राज्यातील रेल्वे पोलीस आयुक्तालय वगळता सर्व १० आयुक्तालयांना विशेष ड्रोन पुरविण्यात आले आहेत.
राष्ट्रीय आपत्ती अधिनियम व बंदी आदेश तोडणाºयावर कडक कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांना देण्यात आले आहेत. राज्य पोलीस मुख्यालयाच्या प्रशासन विभागाकडून शुक्रवारी ड्रोनचे १२ नग त्याच्या आवश्यक सामग्रीसह वितरित करण्यात आले आहेत, कस्टम विभागाकडून ही अद्ययावत सामग्री मिळविण्यात आली असल्याचे सांगण्यात आले .
कोरोनाच्या विषाणूला लगाम घालण्यासाठी राज्यासह देशात २३ मार्चपासून लॉकडाउन केले आहे. अत्यावश्यक सेवेशिवाय नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई केली आहे. तरीसुद्धा अद्यापही काही प्रमाणात वाहनधारक व नागरिकांच्या ये-जा सुरूच आहेत. त्याशिवाय आपले मूळ गाव सोडून शहर व महानगरात नोकरी व अन्य कारणांनिमित्त स्थायिक झालेल्या नागरिकांनी आपल्या कुटुंबीयांसह गावाकडे मोर्चा वळविल्याने रस्त्यावरील गर्दी कमी होण्यात अडचण येत आहे. कोरोना बाधितांचा आलेख चढत आहे. त्यामुळे ड्रोनचा तत्काळ वापर करण्याचे आदेश पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल यांनी सर्व आयुक्तांना दिले आहेत.
कोठे किती विशेष ड्रोनचे वाटप
मुंबई व ठाणे आयुक्तालयाला प्रत्येकी दोन ड्रोन देण्यात आलेले आहेत, तर नागपूर, पुणे, नवी मुंबई, पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद, नाशिक, सोलापूर, अमरावती या ठिकाणी प्रत्येकी एक ड्रोन पुरविण्यात आला आहे.

ड्रोनवरून होणार चित्रण : जमावबंदी असतानाही अनेक ठिकाणी चौकाचौकात, नाक्यावर तरुण एकत्र जमून गप्पांचा फड रंगवीत आहेत, पोलिसांची गाडी दिसल्यानंतर ते घरात पळ काढतात, आता या अद्ययावत ड्रोनच्या वापरामुळे त्यांची ओळख स्पष्ट होणार असून त्याद्वारे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.
- कृष्ण प्रकाश ( विशेष महानिरीक्षक, प्रशासन, पोलीस मुख्यालय )

Web Title: Drone Watch Now On Citizens Wandering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.