मध्य रेल्वेच्या ट्रॅकवर ड्रोनची राहणार करडी नजर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 02:36 AM2020-08-18T02:36:54+5:302020-08-18T02:37:09+5:30

यात रिअल टाइम ट्रॅकिंग, व्हिडीओ प्रवाह आणि स्वयंचलित अपयश-सुरक्षा मोड देखील आहे.

The drone will keep a close eye on the tracks of the Central Railway | मध्य रेल्वेच्या ट्रॅकवर ड्रोनची राहणार करडी नजर

मध्य रेल्वेच्या ट्रॅकवर ड्रोनची राहणार करडी नजर

googlenewsNext

मुंबई : ड्रोनच्या माध्यमातून पाळत ठेवण्याचे तंत्रज्ञान हे एक महत्त्वाचे आणि खर्चबचतीच्या दृष्टीने प्रभावी साधन म्हणून पाहिले जाते. यामुळे मनुष्यबळाचा वापरही मर्यादित होतो. आता मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातही ड्रोनची नजर असणार आहे.
रेल्वे परिक्षेत्र, रेल्वे ट्रॅक, यार्ड, कार्यशाळा इत्यादी रेल्वे क्षेत्रात चांगली सुरक्षा व पाळत ठेवण्यासाठी मुंबई विभागाने अलीकडेच दोन निन्जा यूएव्ही खरेदी केल्या आहेत. आरपीएफच्या मॉडर्नरायझेशन सेलमधील चार कर्मचाऱ्यांच्या पथकाला प्रशिक्षण देण्यात आले असून, या ड्रोन्स उड्डाणासाठी परवानाही मिळविला आहे. ड्रोनचे परिचालन क्षेत्र दोन किमी आहे आणि २५ मिनिटांपर्यंत ते हवेत उड्डाण करू शकते. त्याचे टेक आॅफ वजन २ किलोपर्यंत आहे आणि दिवसा १२८०बाय ७२० पिक्सेलवर एचडी प्रतिमा कॅप्चर करू शकते. यात रिअल टाइम ट्रॅकिंग, व्हिडीओ प्रवाह आणि स्वयंचलित अपयश-सुरक्षा मोड देखील आहे.
>गुन्हेगारीला चाप बसणार
ड्रोन बीट्सचे विभाजन संपूर्ण रेल्वे मालमत्ता, क्षेत्राची संवेदनशीलता, गुन्हेगारांचे क्रियाकलाप इत्यादींवर आधारित केले गेले आहे. ड्रोन ‘आय इन द स्काय’ म्हणून काम करते आणि संपूर्ण क्षेत्रावर नजर ठेवते. कोणतेही संशयास्पद क्रियाकलाप लक्षात आल्यास गुन्हेगाराला लाइव्ह पकडण्यासाठी, विभागातील जवळच्या आरपीएफ पोस्टवर माहिती दिली जाते. अशा दोन गुन्हेगारांना रिअल टाइम आधारावर वाडीबंदर यार्ड परिसरात आणि दुसरे कळंबोली प्रांगणात पकडण्यात आले आहे. ते यार्डमध्ये रेल्वेच्या कोच / वॅगनमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न करीत होते.
>ड्रोन्सची वैशिष्ट्ये
रेल्वे मालमत्तेची तपासणी आणि यार्ड्स, वर्कशॉप्स, कार शेड्सची सुरक्षा करता येईल
रेल्वे परिसरातील गुन्हेगारी आणि असामाजिक बाबींवर पाळत ठेवता येणार आहे. त्यामध्ये जुगार खेळणे, कचरा टाकणे, अवैध फेरीवाले याला आळा बसेल
गाड्यांच्या सुरक्षित संचालनासाठी असुरक्षित/धोकादायक विभागांचे विश्लेषण करता येईल
आपत्ती साइटवर आणि इतर एजन्सींसह समन्वय साधता येणार
रेल्वे मालमत्तेवरील अतिक्रमणांचे मूल्यांकन करण्यासाठी रेल्वे मालमत्तेचे मॅपिंग करता येईल
गंभीर परिस्थितींमध्ये, सणासुदीच्या काळात गदीर्चे निरीक्षण/व्यवस्थापन करता येईल

Web Title: The drone will keep a close eye on the tracks of the Central Railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.