ड्रोन शोधणार वीज वाहिन्यांवरील दोष; तात्काळ होणार दुरूस्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 01:01 PM2020-07-18T13:01:51+5:302020-07-18T13:04:39+5:30

ड्रोन करणार वीज वाहिन्यांची पाहणी व देखभालीची कामे

Drones detect faults on power lines; Immediate repairs | ड्रोन शोधणार वीज वाहिन्यांवरील दोष; तात्काळ होणार दुरूस्ती

ड्रोन शोधणार वीज वाहिन्यांवरील दोष; तात्काळ होणार दुरूस्ती

Next
ठळक मुद्देमहापारेषण ही देशातील सर्वात मोठी पारेषण कंपनी आहे. राज्यात ६८१ इएचव्ही क्षमतेची उपकेंद्रे आहेत.४८ हजार ३२१ सर्किट किलोमीटरच्या पारेषण वाहिन्या आहेत. १ लाख २८ हजार ९९० एमव्हीए क्षमतेची परिवर्तन क्षमता आहे.२५ हजार एमडब्ल्यू ऊर्जा हाताळणीची क्षमता असलेली पारेषण यंत्रणा आहे.

 

मुंबई : केंद्रीय नागरी विमान वाहतूक विभागामार्फत परवानगी घेऊन उच्च दाब वीज वाहिन्यांची निगा राखण्याचे काम ड्रोनव्दारे करण्याचा उपक्रम महापारेषणव्दारे घेण्यात आला. यात ग्राऊंड पेट्रोलिंग, टॉवर टॉप पेट्रोलिंग, सर्व्हे आदी कामांचा समावेश आहे. यामुळे महापारेषणचा वेळ, पैसा, मनुष्यबळाची बचत होत आहे. विशेषतः दुर्गम भागातून जाणाऱ्या पारेषण वाहिन्यांची कामे करताना ड्रोनचा उपयोग चांगल्या रितीने होत आहे. 

पारेषण वाहिन्यांची देखभाल दुरूस्तीचे काम ड्रोनव्दारे करण्यात येत असल्यामुळे ही कामे चांगल्या पध्दतीने व जलद गतीने होण्यास मदत होत आहे. ड्रोनवर व्हिडिओ कॅमेरा व थर्मोव्हिजन कॅमेरा लावला असल्यामुळे पारेषण वाहिन्यांवर निर्माण होणारे विविध दोष त्वरित निदर्शनास आणून त्यांची तात्काळ दुरूस्ती करणे शक्य होत आहे. नवीन प्रकल्पात सर्व्हेक्षण करण्यासाठीही ड्रोन कॅमेराचा उपयोग होणार आहे. टॉवरच्या अगदी जवळ जाऊन ड्रोनव्दारे तपासणी होत आहे. त्यामुळे हे डायग्नोस्टिक टूल ठरले आहे. तसेच कार्यालयात बसून ड्रोनची हालचाल पाहणेही शक्य झाले आहे. नियमानुसार ड्रोन उडविण्याची उंची ५० मीटरपर्यंत असून, दरम्यान वीज क्षेत्रात ड्रोनव्दारे काम करणारी महापारेषण मात्र देशातील एकमेव कंपनी ठरली आहे.

Web Title: Drones detect faults on power lines; Immediate repairs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.