म्हाडाकडून दोन पुनर्रचित इमारतींतील सदनिका निश्चित करण्यासाठी सोडत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2018 05:15 AM2018-12-02T05:15:43+5:302018-12-02T05:15:57+5:30
मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांच्या हस्ते नुकतीच काढण्यात आली.
Next
मुंबई : मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे मौलाना आझाद रोड येथील ३४६-३५२ व कावासजी पटेल मार्ग-फोर्ट येथील, ३४-३४ ए या दोन पुनर्रचित इमारतींत ५९ मूळ निवासी पात्र भाडेकरू-रहिवाशांचा इमारतीतील सदनिका क्रमांक व सदनिकेचा मजला निश्चित करण्यासाठी संगणकीय सोडत, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांच्या हस्ते नुकतीच काढण्यात आली.
वांद्रे पूर्वेत समाज मंदिर हॉल येथे झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी घोसाळकर म्हणाले की, दोन्ही इमारतीतील रहिवाशांना आता म्हाडाच्या माध्यमातून हक्काचे घर मिळेल. तर, मंडळाचे मुख्य अधिकारी दिनकर जगदाळे म्हणाले, इमारत पुनर्रचनेचे मानसिक समाधान आहे.