४० तालुक्यांत दुष्काळ; दोन दिवसांत होणार घोषणा, पाहा, जिल्हानिहाय यादी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2023 06:30 AM2023-10-24T06:30:55+5:302023-10-24T06:31:36+5:30
या तालुक्यांत येत्या दोन दिवसांत दुष्काळ जाहीर करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्यात मराठवाड्यासह काही जिल्ह्यांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. मदत व पुनर्वसन विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार ४२ तालुके अवर्षणग्रस्त ठरविण्यात आले आहेत. यापैकी मोठ्या प्रमाणावर झळ बसलेले ४० तालुके अंतिम करण्यात आले असून, या तालुक्यांत येत्या दोन दिवसांत दुष्काळ जाहीर करण्यात येणार आहे.
राज्यात यंदा सरासरीपेक्षा सुमारे १२ टक्के पाऊस कमी झाला आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या निकषाप्रमाणे सप्टेंबरमध्ये केलेल्या शास्त्रीय निकषांच्या कसोटीवर ४२ तालुके पात्र ठरले आहेत. तत्पूर्वी १९४ तालुक्यांमध्ये पावसाअभावी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानुसार या तालुक्यांमध्ये दुसऱ्या ट्रिगरनुसार माहिती भरण्यात आली. त्यानुसार केवळ ४२ तालुके पात्र ठरले.
जिल्हानिहाय तालुक्यांची यादी
छत्रपती संभाजीनगर - संभाजीनगर, सोयगाव, जालना : जालना, भोकरदन, बदनापूर, अंबड, मंठा, बीड : वडवणी, धारूर, अंबाजोगाई, लातूर : रेणापूर, धाराशिव : वाशी, धाराशिव, लोहारा, नंदुरबार : नंदुरबार, धुळे : शिंदखेडा, जळगाव : चाळीसगाव, बुलढाणा : बुलढाणा, लोणार, नाशिक : मालेगाव, सिन्नर, येवला, पुणे : शिरूर, मुळशी, पौंड, दौंड, पुरंदर, सासवड, वेल्हा, बारामती, इंदापूर, सोलापूर : करमाळा, माढा, बार्शी, माळशिरस, सांगोला, सातारा : वाई, खंडाळा, कोल्हापूर : हातकणंगले, गडहिंग्लज, सांगली : शिराळा, कडेगाव, खानापूर, विटा, मिरज.