मुंबई : राज्यात अनेक भागात दुष्काळी परिस्थिती आहे. मंत्रिमंडळ उपसमिती आता वेगवेगळ्या निकषांवर आधारित मंडळ स्तरावर जात आहे. लवकरच दुष्काळी मंडळांचीही घोषणा होईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. केंद्राच्या निकषानुसार, राज्यातील ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाला आहे. यावरून झालेल्या टीकेनंतर मंत्रिमंडळ बैठकीत ९०० मंडळनिहाय दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला.
याबाबत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी कुलाबा येथील पालावारची दिवाळी' या कार्यक्रमावेळी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित होते. मुंब्रा येथे ठाकरे गट आणि शिंदे गट शनिवारी समोरासमोर आला होता. त्याबद्दल विचारले असता, कालचा दिवस गेला आज नवीन सुरू झाला, असे फडणवीस म्हणाले.