डरॉँव.. डराँव... बंद होण्याच्या मार्गावर
By admin | Published: July 25, 2015 10:17 PM2015-07-25T22:17:47+5:302015-07-25T22:17:47+5:30
एकेकाळी शेतीला लाभदायक व शेतकऱ्यांचा मित्र समजला जाणारा बेडूक हा प्राणी विषारी रासायनिक खतांमुळे नामशेष होत आहे. कुठेही डराव डराव आवाज ऐकू येत नाही.
मनोर : एकेकाळी शेतीला लाभदायक व शेतकऱ्यांचा मित्र समजला जाणारा बेडूक हा प्राणी विषारी रासायनिक खतांमुळे नामशेष होत आहे. कुठेही डराव डराव आवाज ऐकू येत नाही.
हा सगळा रासायनिक खतांचा परिणाम ग्रामीण भागात दिसू लागला आहे.
पाऊस सुरू झाला की, बेडकांचे आवाज ऐकू यायचे. शेतामध्ये विविध रंगांचे बेडूक उड्या मारताना दिसत होते. मात्र, गेल्या चार-पाच वर्षांपासून त्यांची संख्या कमी होत चालली असून यंदा कुठेही ते नजरेस पडत नाहीत.
मात्र, शेतकऱ्यांनी शेतात लवकर व दर्जेदार पीक यावे म्हणून रासायनिक खतांची फवारणी करण्यास सुरुवात केली. या रासायनिक फवारणीमुळे पिकांवर येणारे कीटक व अन्य जीव मृत्युमुखी पडत व त्या कीटकांना बेडूक फस्त करून आपली उपजीविका चालवू लागले.
त्याचा परिणाम उलट होत गेला. रासायनिक फवारणीमुळे मरून पडलेल्या कीटकांना खाऊन बेडकांच्या प्रकृतीवर परिणाम होऊ लागला. यातून त्यांची मोठ्या प्रमाणात संख्या कमी होत गेली. (वार्ताहर)