उच्चभ्रू वर्तुळात ड्रग्ज तस्करी करणाऱ्याला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:06 AM2021-02-08T04:06:56+5:302021-02-08T04:06:56+5:30
* एनसीबीची कारवाई * एमडीसह मर्सिडीज जप्त लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई - शहर व उपनगरांतील उच्चभ्रू वर्तुळात ड्रग्जची तस्करी ...
* एनसीबीची कारवाई
* एमडीसह मर्सिडीज जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई - शहर व उपनगरांतील उच्चभ्रू वर्तुळात ड्रग्जची तस्करी करणाऱ्या एका तरुणाला अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) अटक केली. इब्राहिम मुजावर ऊर्फ इब्राहिम कासकर असे त्याचे नाव असून, त्याच्याकडून १०० ग्रॅम मेफोडीन व मर्सिडीज कार जप्त केली आहे. कासकर हा ड्रग्ज माफिया आसिफ राजकोटवाला याचा साथीदार असून, त्याच्यावर खुनाचा प्रयत्न आणि पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडे गुन्हा दाखल असल्याचे सूत्रांनी सांगितले.
अमली पदार्थांचे सेवन व तस्करी करणाऱ्यांविरुद्ध ‘एनसीबी’कडून कारवाईचा धडाका सुरू आहे. शनिवारी (दि. ६) पथकाने जोगेश्वरी परिसरातून इब्राहिमला अटक करून त्याच्याकडील एमडी पावडर जप्त केली. तो उच्चभ्रू वर्तुळातील व्यक्ती, तरुण-तरुणींना ड्रग्ज पुरवीत होता. त्यासाठी तो आपल्या मर्सिडीजचा वापर करीत असे. गेल्या वर्षभरापासून तो आसिफसमवेत तस्करीचे काम करीत होता. त्याच्याकडून या क्षेत्रातील आणखी नावे समोर येण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.