वांद्र्यातील ड्रग्ज, पब कल्चरवर कारवाई करा, आमदार शेलारांची पोलिसांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 03:55 AM2020-09-01T03:55:18+5:302020-09-01T03:55:49+5:30

आमदार शेलार यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेत कारवाईची मागणी केली. मुंबई आणि विशेषत: माझ्या वांद्रे पश्चिम मतदारसंघातील अवैध अमली पदार्थांच्या समस्येसंदर्भात यापूर्वीही पोलिसांना सविस्तर पत्र देत कारवाईची मागणी केली होती.

Drugs in Bandra, take action on pub culture, MLA Shelar demands from police | वांद्र्यातील ड्रग्ज, पब कल्चरवर कारवाई करा, आमदार शेलारांची पोलिसांकडे मागणी

वांद्र्यातील ड्रग्ज, पब कल्चरवर कारवाई करा, आमदार शेलारांची पोलिसांकडे मागणी

Next

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या केसच्या तपासात चर्चेत आलेल्या ड्रग्ज, पब आणि पार्टी कल्चरचे अनेक अड्डे वांद्रे पश्चिम परिसरात असून त्याविरोधात कारवाई करण्याची मागणी स्थानिक आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.
आमदार शेलार यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेत कारवाईची मागणी केली. मुंबई आणि विशेषत: माझ्या वांद्रे पश्चिम मतदारसंघातील अवैध अमली पदार्थांच्या समस्येसंदर्भात यापूर्वीही पोलिसांना सविस्तर पत्र देत कारवाईची मागणी केली होती. अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर पुन्हा एकदा ड्रग्जचा विषय ऐरणीवर आला आहे.
माझ्या वांद्रे, खार, सांताक्रुझ या मतदारसंघ क्षेत्रात अनेक पब, बार आणि रेस्टॉरंट्स आहेत जे कायद्यांचे किंवा नियमांचे उल्लंघन करीत असून संबंधित यंत्रणांचे अधिकारी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. या पबपैकी बऱ्याच जणांनी बेकायदेशीरपणे अतिक्रमण केले आहे आणि परवानगी दिलेल्या वेळेच्या पलीकडे अनियंत्रित नाइटलाइफ पार्ट्या सुरू असतात.
वांद्रे सी-लिंक प्रोमेनेड, आय लव्ह मुंबई परिसर, वांद्रे पश्चिम, रेक्लेमेशन परिसरात राहुलनगर, नर्गिस दत्तनगर, रंगशारदा हॉटेलच्या समोर आणि मागील बाजू; बीएमसी गार्डन (जनरल अरुणकुमार वैद्य गार्डन), अरुण कुमार वैद्यनगरसमोर; गझदर बांधची खाडीजवळची अवैध झोपडपट्टी; मुरगन चाळ, सांताक्रुझ पश्चिम; वांद्रे स्टेशन पश्चिम परिसरातील शास्त्रीनगर; ओएनजीसी लेनवरील पब आणि बार, वांद्रे रेक्लेमेशन या परिसरात ड्रग्जचा कारभार सुरू असल्याच्या तक्रारी स्थानिकांकडून आल्या आहेत. यावर कारवाई करावी, अशी मागणी शेलार यांनी केली आहे.

अंडरवर्ल्डप्रमाणे सर्व ड्रग माफियांचे नेटवर्क नष्ट करण्यासाठी मुंबई पोलिसांनी धडक मोहीम हाती घ्यावी. अशा नेटवर्कमधील संबंधित मालमत्ता जप्त करून कठोर कारवाई करण्याची आवश्यकता असल्याचे शेलार म्हणाले. ड्रग्जचे सेवन एकीकडे तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त करीत असून मादक पदार्थांच्या व्यापारात गुंतलेल्यांचे भारताविरोधी परदेशी शक्तींशी थेट संबंध आहेत.

Web Title: Drugs in Bandra, take action on pub culture, MLA Shelar demands from police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.