Join us  

ड्रग्ज प्रकरणी आणखी आठ ते नऊजण रडारवर

By admin | Published: April 18, 2016 1:47 AM

इफेड्रीन पावडरचा साठा सापडल्यानंतर तपासाकरिता पोलिसांनी तीन पथकांची स्थापना केली असून या प्रकरणात आणखी ८ ते ९ जणांच्या मागावर पोलीस आहेत. तपास पथकांनी गुजरात

- पंकज रोडेकर,  ठाणे

इफेड्रीन पावडरचा साठा सापडल्यानंतर तपासाकरिता पोलिसांनी तीन पथकांची स्थापना केली असून या प्रकरणात आणखी ८ ते ९ जणांच्या मागावर पोलीस आहेत. तपास पथकांनी गुजरात, सोलापूर तसेच अन्य राज्यांतही तपासाचे जाळे पसरवल्याची माहिती सूत्रांनी दिली. ड्रग्ज विक्रीचे हे मोठे रॅकेट असून पोलिसांच्या हाती लागलेल्या माहितीनुसार या पावडरच्या विक्रीत आणखी ८ ते ९ जण सहभागी आहेत. याबाबत, सध्या तपास सुरू असून संपूर्ण खातरजमा केल्यावर आणखी काहींना अटक केली जाणार आहे. अनुभवातून पावडरची निर्मितीसीलबंद करण्यात आलेल्या कंपनीचा सीनिअर प्रॉडक्शन मॅनेजर राजेंद्र डिमरी हा एम.एससी झाला होता. त्याने देशातील तीन ते चार नामांकित औषध बनवणाऱ्या कंपनीत काम केले आहे. तोच या कंपनीतील माल त्याचा सहकारी स्वामी याच्याद्वारे विकत होता.पथकात २० ते २५ जणठाणे अमली पदार्थविरोधीविभागाकडे कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे. मात्र, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तीन पथके तयार करण्यात आली असून प्रत्येक पथकात ५ ते ६ अधिकारी यानुसार सुमारे १५ ते १७ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

स्वामीचा तो मित्र कोण?वर्तकनगर परिसरात इफेड्रीन पावडरच्या विक्रीसाठी आलेल्या सागरची सोलापुरातील स्वामीशी त्याच्याच कंपनीत काम करणाऱ्या मित्राने ओळख करून दिली होती. तो मित्र आणि स्वामी हे दोघे एकाच गावाचे असल्याने तो मित्र कोण, याचाही शोध सुरू केला.

एमडीला पर्याय इफेड्रीनएमडी या अमली पदार्थापेक्षा इफेड्रीन ही पावडर स्वस्तात सहज उपलब्ध होऊ लागल्याने तिची मागणी वाढली. कोकेनमध्ये एकत्र केली तरी समजून येत नाही.