Join us

ड्रग्ज, सोने तस्करीतील आंतरराष्ट्रीय टोळी उद्ध्वस्त; ५ हस्तक अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 5:31 AM

विमानतळावर ड्रग्ज तस्करीत अटक केलेल्या फुरखाना शेखच्या चौकशीत मुंबईच्या अमलीपदार्थविरोधी पथकाने ड्रग्ज, सोने तस्करीतील आंतरराष्ट्रीय टोळी उद्ध्वस्त केली आहे. त्यातील पाच हस्तकांना अटक करण्यात एएनसीला यश आले आहे.

मुंबई : विमानतळावर ड्रग्ज तस्करीत अटक केलेल्या फुरखाना शेखच्या चौकशीत मुंबईच्या अमलीपदार्थविरोधी पथकाने ड्रग्ज, सोने तस्करीतील आंतरराष्ट्रीय टोळी उद्ध्वस्त केली आहे. त्यातील पाच हस्तकांना अटक करण्यात एएनसीला यश आले आहे.अमलीपदार्थविरोधी पथकाचे पोलीस उपायुक्त शिवदीप लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. फुरखानापाठोपाठ एएनसीने कर्नाक बंदर येथून तबस्सुम मोहम्मद शेख, कर्नाटकच्या रशीद हसन फारस यांच्यासह केरळमधून अब्दुल रशीद मुल्ला, मुस्तकीन मोहम्मद अली के.पी. कनुर यांना बेड्या ठोकल्या आहेत.फुरखाना ही कुर्ल्यात राहते. १८ सप्टेंबर रोजी ड्रग्ज तस्करीत मुंबई विमानतळावर तिला अटक झाली. तिच्या चौकशीत ती तबस्सुमच्या माध्यमातून ड्रग्ज तस्करीची टोळी चालवत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी तबस्सुमला अटक केली. त्यापाठोपाठ अन्य तिघांनाही अटक केली. तेव्हा त्यांच्या चौकशीत हे पाचही जण ड्रग्ज तस्करीबरोबरच संशयित हवाला तसेच सोन्याच्या तस्करीतील टोळीचे हस्तक असल्याचे उघड झाले.

टॅग्स :गुन्हेगारी