मुंबई विमानतळावर २० कोटींचे अमली पदार्थ जप्त, दोन परदेशी महिलांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2021 08:39 AM2021-11-28T08:39:06+5:302021-11-28T08:39:40+5:30
मुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर २० कोटींचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. सीमाशुल्क विभागाने या प्रकरणी ...
मुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर २० कोटींचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. सीमाशुल्क विभागाने या प्रकरणी दोघा परदेशी महिलांना अटक केली आहे.
क्येनगेरा फातुमा (४५) व मनसिंबे झायनाह (२७) अशी अटक केलेल्या महिलांची नावे असून, त्या युगांडा देशाच्या नागरिक आहेत. त्यांनी सुदानवरून मुंबईत एका तस्कराला देण्यासाठी हेरॉईनचा साठा आणला होता. दोघीही दुबईमार्गे भारतात दाखल झाल्या होत्या. दुबईवरून दोन महिला अमली पदार्थ घेऊन येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सीमाशुल्क विभागाने सापळा रचून ही कारवाई केली. स्कॅनरद्वारे त्यांच्याकडील सामानाची तपासणी केली असता त्यात संशयास्पद पूड आढळली. पडताळणीअंती ते हेरॉईन असल्याचे निष्पन्न झाले. दोघींकडे तीन किलो ९१० ग्रॅम हेरॉईन सापडले असून, त्याची किंमत सुमारे २० कोटी रुपये आहे. दोघींना अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे.
झायनाहकडे एक किलो ९४२ ग्रॅम, तर तिची आई फातुमाकडे एका किलो ९६८ ग्रॅम हेरॉईन सापडले. दोघींविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघींची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.