मुंबईतून पावणेसहा कोटींचे ड्रग्ज जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:05 AM2021-07-02T04:05:57+5:302021-07-02T04:05:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईतून पावणेसहा कोटी रुपये किमतीचे एमडी आणि हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. अमलीपदार्थ विरोधी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईतून पावणेसहा कोटी रुपये किमतीचे एमडी आणि हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. अमलीपदार्थ विरोधी विभागाच्या वांद्रे पथकाने बुधवारी ही कारवाई केली. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणात संजीब निमय सरकार (३९) आणि सलीम अकबर खान (४१) या दोघांना गोरेगाव येथील न्यू लिंक रोड परिसरातून अटक करण्यात आली. सरकार हा गोरेगाव तर खान हा मालाडचा रहिवासी आहे. या कारवाईत अडीच कोटी किमतीचे एमडी आणि ३ कोटी २४ लाख किमतीचे हेरॉईन जप्त करण्यात आले. तसेच आरोपींकडून ६५ हजार रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली. या कारवाईत एकूण ५ कोटी ७४ लाख किमतीचा ड्रग्जसाठा जप्त करण्यात आला आहे.
वांद्रे पथकाचे पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. यातील खान हा अभिलेखावरील आरोपी असून, त्याच्याविरुद्ध यापूर्वीदेखील गुन्हा नोंद आहे.