दारूच्या नशेत पोलिसांच्या गाडीला धडक; पोलिसाचा मोडला पाय, दोघांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 06:49 IST2025-03-15T06:49:50+5:302025-03-15T06:49:57+5:30

अपघातामध्ये डाव्या पायाच्या घोट्याजवळील हाड मोडले

Drunk man hits police bike policeman breaks leg | दारूच्या नशेत पोलिसांच्या गाडीला धडक; पोलिसाचा मोडला पाय, दोघांवर गुन्हा दाखल

दारूच्या नशेत पोलिसांच्या गाडीला धडक; पोलिसाचा मोडला पाय, दोघांवर गुन्हा दाखल

मुंबई : दारूच्या नशेत असलेल्या कारचालकाने पोलिसांच्या पेट्रोलिंग दुचाकीला मागून धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील पोलिस कर्मचाऱ्याचा पाय मोडला. याप्रकरणी एमएचबी कॉलनी पोलिसांनी एका शेफसह दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार रवींद्र ढामळे (३६) हे एमएचबी कॉलनी पोलिस ठाण्यात शिपाई म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या तक्रारीनुसार गुरुवारी (दि. १३) होळीच्या रात्री पावणेदोनच्या सुमारास ते बोरिवली पश्चिमच्या आयसी कॉलनी परिसरात सुमानिया हॉटेलसमोर बीट मार्शल दुचाकीसह थांबवले होते. त्या दरम्यान एका सफेद रंगाच्या कारने त्यांना मागून जोरदार धडक दिली. या धडकेमुळे ते गाडीसह खाली पडले. त्यानंतर त्या गाडीने अन्य एका लाल रंगाच्या कारला मागून धडक दिली. 

दारूच्या नशेत गाडी चालविली

या अपघातामध्ये त्यांच्या डाव्या पायाच्या घोट्याजवळील हाड मोडले. हॉटेल कर्मचारी आणि इतरांनी ढामळे यांना रस्त्याच्या कडेला बसवले. अधिक चौकशीमध्ये चालकाचे नाव मिथिल उपाध्याय (२६) असून, तो एक शेफ आहे. तो दहिसरच्या आनंदनगरमधील ब्लू डायमंड इमारतीत राहतो. तसेच त्याच्या बाजूला बसलेला चिराग कावा (४६) हा कांदिवली पूर्वच्या समतानगर परिसरात शहापूरजी पालनजी बिल्डिंगचा रहिवासी असून, त्याचीच ती गाडी असल्याचे तपासात उघड झाले. चौकशीत अडखळणाऱ्या या दोघांनीही वाहन चालवताना मद्य प्राशन केल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. तसेच मिथिलकडे गाडी चालवण्याचा परवाना नसतानाही त्याने गाडी चालवली, असे पोलिसांचे म्हणणे आहे. जखमी ढामळेना शताब्दी रुग्णालयात दाखल केले आहे. 
 

Web Title: Drunk man hits police bike policeman breaks leg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.