मद्यपीचा बससमोर भररस्त्यात धिंगाणा, वाहन चालकासह पोलिसाला मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 12:04 PM2023-03-23T12:04:01+5:302023-03-23T12:06:36+5:30

याप्रकरणी कफपरेड पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. याप्रकरणी असिफ हमीद शेख (२७) याला अटक केली आहे.

Drunkard rioting in front of the bus, assaulting the policeman along with the driver | मद्यपीचा बससमोर भररस्त्यात धिंगाणा, वाहन चालकासह पोलिसाला मारहाण

मद्यपीचा बससमोर भररस्त्यात धिंगाणा, वाहन चालकासह पोलिसाला मारहाण

googlenewsNext

मुंबई : कफपरेड येथे भररस्त्यात बससमोर येत मद्यपीने धिंगाणा घातल्याने मंगळवारी तणावाचे वातावरण होते. बसची तोडफोड करत, चालकासह पोलिसाला मारहाण केली आहे. याप्रकरणी कफपरेड पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. याप्रकरणी असिफ हमीद शेख (२७) याला अटक केली आहे.

या हल्ल्यात चालक हेमंत कदम आणि पोलिस शिपाई विनायक जयकर जखमी झाले असून, त्यांच्यावर जीटी रुग्णालयात उपचार सुरू आहे. जयकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सोमवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास येथील आंबेडकरनगर चौकात असिफ याने सीएसटीकडे जात असलेल्या बससमोर येऊन शिवीगाळ सुरू केली. तसेच काचेवरील वायपर तोडून बसचे नुकसान केले. यामुळे परिसरात वाहतूक कोंडी होत गोंधळ निर्माण झाला. चालकाने त्याला समजवून सांगण्याचा प्रयत्न करताच त्याने चालक कदम यांना मारहाण केली.

घटनेबाबत समजताच कफपरेड पोलिस ठाण्यातील जयकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा शेखने त्यांनाही मारहाण केली. यामध्ये त्यांच्या खांद्याला, पोटाला मार लागला. पोलिस ठाण्यातील अन्य सहकाऱ्यांनी घटनास्थळी येत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. मंगळवारी पहाटेच्या सुमारास त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

विक्रोळीतही पोलिसाला मारहाण
सराईत आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसाला मारहाण केल्याची घटना मंगळवारी विक्रोळीत घडली. याप्रकरणी पार्क साईट पोलिसांनी विजय भारत मस्तूद याला अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध पार्क साईटसह विविध पोलिस ठाण्यांत गुन्ह्यांची नोंद आहे.

Web Title: Drunkard rioting in front of the bus, assaulting the policeman along with the driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई