लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घालणाऱ्याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसावर पेव्हर ब्लॉकने हल्ला करण्यात आल्याची घटना रविवारी घाटकोपर परिसरात घडली. यात पोलीस हवालदार जखमी झाले असून, त्यांना सात टाके पडले.
रविवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास असल्फा गावातील शिंदे चाळीत राहणारा ओमकार कांबळी (२३) मोठ्या आवाजात शिविगाळ करत घरांवर दगडफेक करत असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली. त्यानुसार घाटकोपर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले रामा कांबळे (५२) हे तक्रारदार दीपक देसाई (४७) यांच्यासह अन्य सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी गेले. ओमकारला ताब्यात घेऊन खाली येत असताना तो शिविगाळ करू लागला. अचानक तो खाली वाकला आणि रस्त्यावरील पेव्हर ब्लॉक त्याने कांबळे यांच्या डोक्यात मारून तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र अन्य सहकाऱ्यांनी त्याला पकडून पोलीस ठाण्यात आणले. कांबळे यांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना सात टाके पडले असून, घाटकोपर पोलीस अधिक तपास करत आहेत.
......................................
घाटकोपर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले रामा कांबळे (५२) यांच्या तक्रारीवरून पोलीस अधिक तपास करत आहे.