सुका कच:यासाठी दारात गाडी
By Admin | Published: December 7, 2014 02:05 AM2014-12-07T02:05:34+5:302014-12-07T02:05:34+5:30
ओला व सुका कचरा एकत्रितच डम्पिंग ग्राउंडवर जात असल्याची टीका सतत होत असल्याने सुका कचरा उचलण्याची वाहने आणि केंद्र वाढविण्याचा निर्णय पालिकेने घेतला आह़े
मुंबई : ओला व सुका कचरा एकत्रितच डम्पिंग ग्राउंडवर जात असल्याची टीका सतत होत असल्याने सुका कचरा उचलण्याची वाहने आणि केंद्र वाढविण्याचा निर्णय पालिकेने घेतला आह़े तसेच नागरिकांनी वेगळा केलेला सुका कचरा उचलण्यासाठी निवासी सोसायटय़ांच्या मागणीनुसार स्वतंत्र गाडीच पाठविण्यात येणार आह़े
पालिकेने 2क्क्6 मध्ये ओला व सुका कचरा वर्गीकरण बंधनकारक केल़े परंतु नागरिकांकडून या मोहिमेस अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही़ याबाबत अनेक वर्षे चर्चेचे गु:हाळ उडवणा:या पालिकेला अखेर आठ वर्षानंतर जाग आली आह़े म्हणूनच सुका कचरा उचलण्यासाठी स्वतंत्र यंत्रणोची उभारणी करण्यात
येणार आह़े
त्यानुसार वाहने आणि केंद्र वाढविण्याबरोबरच नागरिकांच्या मागणीनुसार केवळ सुका कचरा उचलणारी गाडीच निवासी सोसायटय़ांच्या दारात येऊन उभी राहणार आह़े
सुका कचरा घरात साठवून ठेवणो शक्य नसल्याने नागरिकांनी पालिकेशी संपर्क साधल्यास ही गाडी येऊन सुका कचरा उचलून नेईल़ काही दिवसांमध्येच ही सेवा विभागस्तरावर सुरू होणार आह़े (प्रतिनिधी)
च्मुंबईत दररोज नऊ हजार मेट्रिक टन कचरा जमा होत असतो़ यापैकी अडीच हजार मेट्रिक टन निव्वळ दगड-माती असे बांधकामांचे साहित्य असत़े तसेच सुक्या कच:याचे प्रमाणही अधिक असत़े
च्हा कचरा भंगारातही विकणो शक्य नसल्याने नागरिक ओल्या कच:यामध्येच फेकून देतात़ त्यामुळे सुक्या कच:यावर पुनप्र्रक्रिया करणो शक्य होत नाही़ सुका कचरा वेगळा केल्यास डम्पिंग ग्राउंडवरील कच:याचा भार कमी होऊ शकेल़
च्सध्या पालिकेकडे सुका कचरा उचलण्यासाठी 46 वाहने आहेत़ प्रत्येक वॉर्डात दोन वाहने देण्यात आली असून आठवडय़ातून दोन वेळा निवासी सोसायटय़ांमधून सुका कचरा गोळा करण्यात येतो़