२ जानेवारीपासून राज्यात कोरोना लसीकरणाचा ड्राय रन - आरोग्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:06 AM2021-01-02T04:06:22+5:302021-01-02T04:06:22+5:30

२ जानेवारीपासून राज्यात कोरोना लसीकरणाचा ड्राय रन - आरोग्यमंत्री पुणे, नागपूर, जालना, नंदुरबार या चार जिल्ह्यांची निवड लोकमत न्यूज ...

Dry run of corona vaccination in the state from January 2 - Health Minister | २ जानेवारीपासून राज्यात कोरोना लसीकरणाचा ड्राय रन - आरोग्यमंत्री

२ जानेवारीपासून राज्यात कोरोना लसीकरणाचा ड्राय रन - आरोग्यमंत्री

Next

२ जानेवारीपासून राज्यात कोरोना लसीकरणाचा ड्राय रन - आरोग्यमंत्री

पुणे, नागपूर, जालना, नंदुरबार या चार जिल्ह्यांची निवड

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : देशभरात २ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाचा ड्राय रन होणार असून, त्यासाठी महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, जालना, नंदुरबार या चार जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी याबाबत घेतलेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लसीकरणाच्या तयारीबाबत मार्गदर्शन करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

ड्राय रनसाठी एकाच जिल्ह्यातील तीन आरोग्य केंद्रे निवडण्यात आली आहेत. लसीकरणाच्या या ड्राय रनमध्ये निवडण्यात आलेल्या तीनही ठिकाणच्या प्रत्येकी २५ जणांना लसीकरणासाठी निवडण्यात येणार आहे. प्रत्यक्षात लस टोचण्यात येणार नाही; मात्र त्यासाठी ज्या मार्गदर्शक सूचना आहेत त्याप्रमाणे सर्व तयारी केली जाणार आहे. लसीकरणाच्या ठिकाणी वीज, इंटरनेट, सुरक्षा यासोबत प्रतीक्षा कक्ष, लसीकरण कक्ष आणि निरीक्षण कक्ष असे तीन कक्ष केले जातील.

महाराष्ट्रातील पुणे येथील जिल्हा रुग्णालय - औंध, प्राथमिक आरोग्य केंद्र - मान, पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील जिजामाता रुग्णालय, नागपूर जिल्ह्यातील डागा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय - कामटी, नागपूर महापालिकेचे शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, जालना येथील जिल्हा रुग्णालय - जालना, उपजिल्हा रुग्णालय - अंबड, बदनापूर तालुक्यातील शेळगाव प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालय - नंदुरबार, प्राथमिक आरोग्य केंद्र आष्टे आणि नवापूर उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी लसीकरणाचा ड्राय रन होणार आहे.

Web Title: Dry run of corona vaccination in the state from January 2 - Health Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.