सुक्या कचऱ्यावरही आता होणार प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 02:47 AM2018-10-26T02:47:15+5:302018-10-26T02:47:18+5:30

मुलुंड डम्पिंग ग्राउंडला टाळे लागल्यानंतर, आता देवनार कचराभूमीही बंद होण्याच्या मार्गावर आहे.

Dry waste will now be processed | सुक्या कचऱ्यावरही आता होणार प्रक्रिया

सुक्या कचऱ्यावरही आता होणार प्रक्रिया

Next

मुंबई : मुलुंड डम्पिंग ग्राउंडला टाळे लागल्यानंतर, आता देवनार कचराभूमीही बंद होण्याच्या मार्गावर आहे. मात्र, पर्यायी डम्पिंग ग्राउंड नसल्यामुळे मुंबईत येत्या काही वर्षांमध्ये कचºयाचा प्रश्न पेटण्याची चिन्हे आहेत. ओल्या व सुक्या कचºयावर प्रक्रिया करूनच मुंबईची ही समस्या सुटू शकते. त्यामुळे गृहनिर्माण सोसायट्यांना ओल्या कचºयावर प्रक्रियेची सक्ती केल्यानंतर आता सुक्या कचºयावरही प्रक्रिया करण्यात येणार आहे.
डम्पिंग ग्राउंडची मर्यादित क्षमता आणि पर्यायी डम्पिंग ग्राउंड नसल्यामुळे मुंबई महापालिकेने कचºयाचे प्रमाण कमी करण्यावर भर दिला आहे. यासाठी दररोज शंभर किलो कचरा निर्माण करणाºया सोसायट्यांना त्यांच्या आवारात ओल्या कचºयावर प्रक्रिया करणे बंधनकारक केले आहे. आतापर्यंत ४० टक्के सोसायट्या व आस्थापनांनी प्रतिसाद देत ओल्या कचºयावर प्रक्रिया सुरू केली आहे. तर उर्वरित सोसायट्यांवर दंडात्मक कारवाई, प्रबोधन आदी मार्गाने वळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
मात्र सुका कचरा, ई-कचरा, प्लॅस्टिकचा कचरा, जैविक कचºयाची विल्हेवाट लावण्याचे आव्हान महापालिकेपुढे आहे.
मुंबईत दररोज ८०० ते एक हजार मेट्रिक टन इतका सुका कचरा निर्माण होतो. सुक्या कचºयाची विल्हेवाट लावण्यासंदर्भात विविध तंत्रज्ञान, प्रक्रिया, क्षमता, अनुभव, यंत्रणा आदी निकषांवर खाजगी संस्थांची या कामासाठी नियुक्ती करण्यात येणार आहे.
या संस्थेला प्रक्रियेसाठी महापालिकेमार्फत कुलाबा, देवनार, मालवणी येथे भूखंड उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
>२0 नोव्हेंबरपर्यंत मुदत : महापालिकेद्वारे ३ नोव्हेंबर २०१८ रोजी बैठक आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये प्रस्ताव सादर करण्यासंबंधी काही अडचणी असल्यास त्यांचे निराकरण करण्यात येणार आहे. २० नोव्हेंबरनंतर नियुक्त केलेल्या मूल्यांकन समितीसमोर प्रस्तावांचे सविस्तर सादरीकरण करून निर्णय घेण्यात येणार आहे. खाजगी संस्थेच्या कामाची व्याप्ती, निवडीचे निकष, आवश्यक कागदपत्रे आदी सविस्तर माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
>दररोज जमा होतो
७ हजार मे. टन कचरा
मुंबईत आजमितीला दररोज सात हजार ६०० मेट्रिक टन कचरा जमा होत आहे. हे कचºयाचे प्रमाण दररोज पाच हजार मेट्रिक टनापर्यंत कमी करण्याचे पालिकेचे लक्ष्य आहे.
>टोल फ्री क्रमांकावर शंकेचे निरसन
नियोजित पद्धतीने सुका कचरा संकलन करण्यासाठी संकेतस्थळ, टोल फ्री, तक्रार निवारण प्रणाली संस्थेने सुरू करावी. जेणेकरून मुंबईकरांच्या या विषयातील अडचणी दूर करणे शक्य होईल. त्यामुळे कचºयाचे नियोजनही होणे शक्य आहे.
>अशी आहे संस्थेची जबाबदारी
सुक्या कचºयाचे संकलन, प्रक्रिया स्थळांपर्यंत वाहन व त्यासाठी आवश्यक प्रणाली विकसित करणे.
गृहनिर्माण सोसायटी किंवा व्यावयासिक संस्थेमधून निर्माण झालेला सुका कचरा प्रक्रिया केंद्रापर्यंत वाहून आणल्यानंतर त्यातील प्लॅस्टिक, कागद, धातू आदींमध्ये वर्गीकरण करून त्यावर प्रक्रिया व पुन:प्रक्रिया करणे.
मुंबईमध्ये निर्माण होणाºया सुक्या कचºयावर प्रतिदिन १०० मे. टनपासून २५० टनापर्यंत प्रक्रिया, पुनर्वापर क्षमता असणे अपेक्षित आहे.

Web Title: Dry waste will now be processed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.