दुबईत नोकरीच्या आमिषाने ३२ लाखांना गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 04:47 AM2018-06-13T04:47:28+5:302018-06-13T04:47:28+5:30

  दुबईत नोकरीचे आमिष दाखवत पिता-पुत्राने तब्बल ५३ बेरोजगारांना सुमारे ३२ लाखांना गंडा घातल्याचा प्रकार गोरेगावात उघडकीस आला आहे.

 Dubai borrows 32 lakh jobs | दुबईत नोकरीच्या आमिषाने ३२ लाखांना गंडा

दुबईत नोकरीच्या आमिषाने ३२ लाखांना गंडा

googlenewsNext

मुंबई -  दुबईत नोकरीचे आमिष दाखवत पिता-पुत्राने तब्बल ५३ बेरोजगारांना सुमारे ३२ लाखांना गंडा घातल्याचा प्रकार गोरेगावात उघडकीस आला आहे. मोहम्मद दानिश खान व त्याचे वडील खयाल मोहम्मद खान अशी त्यांची नावे असून त्यांच्या विरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
खानने इम्तियाज यरगट्टी (३६) याला मेल पाठवून कामासाठी माणूस पाहिजे असे सांगितले. त्यानुसार काही लोकांना यरगट्टी यांनी खान याच्याकडे पाठविले. सुरुवातीला त्याने काही लोकांना दुबईला पाठवले. त्यानंतर काही दिवसांपूर्वी त्याने पुन्हा यरगट्टी यांना संपर्क केला. सफाई, रिसेप्शन आणि गवंडी काम करण्यासाठी २० ते ३० लोकांची गरज दुबईत एका कंपनीला आहे, असे त्यांना सांगितले. खानने यरगट्टी यांच्या बेळगाव येथील आॅफिसला जाऊन त्या लोकांची मुलाखत घेतली. यरगट्टी यांनी खानला त्या लोकांचे फोटो आणि कागदपत्रेदेखील दिली. एका व्यक्तीला दुबईला पाठविण्यासाठी ६० हजार रुपये लागतील. मात्र सध्या २५ हजार अनामत रक्कम प्रत्येक व्यक्तीमागे पाठवा, असे खयाल यांनी यरगट्टी याना फोन करून सांगितले. त्यानुसार त्यांनी वर्ल्ड टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स या कंपनीच्या नावे पैसे पाठवले. मात्र ते घेऊन ते बाप-बेटे फरार झाले. तसेच ३१ लाख ८० हजार रुपयांची रोकडदेखील त्यांनी पळवून नेली.
 

Web Title:  Dubai borrows 32 lakh jobs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.