लाइकचे टास्क देऊन गंडविणाऱ्या टोळीचे दुबई व्हाया चीन कनेक्शन; सहा जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2023 11:18 AM2023-09-03T11:18:19+5:302023-09-03T11:18:23+5:30
सहा जणांना साकीनाका पोलिसांकडून अटक
मुंबई : ‘लाइक करा, शेअर करा आणि कमवा’ या टास्कद्वारे मोठी कमाई करण्याचे आमिष दाखवत लोकांना लक्ष्य करणाऱ्या एका अत्याधुनिक घोटाळ्यातील सहा जणांना साकीनाका पोलिसांनी अटक केली. अटक आरोपींची नावे पृथ्वीराज चौहान, प्रदीप राजभर, शिवम सिंग, संदीप यादव, विश्वास चौरसिया आणि निखिल सिंग अशी असून, या घोटाळ्याचे दुबई ते चीनपर्यंत कनेक्शन असल्याचे उघड झाले आहे. अंधेरीत राहणाऱ्या गृहिणीला या टोळीने ४ ऑगस्टला लक्ष्य केले. डिजिटल कंपनीची प्रतिनिधी असल्याचा दावा करणाऱ्या ‘सोफिया’ या व्यक्तीकडून १ ऑगस्टला त्यांना मेसेज मिळाला.
युजर आयडी, पासवर्ड
प्रत्येक खात्यासाठी ५ हजार रुपये कमिशन दिले. पुढे दुबईतून काम करणाऱ्या भामट्यांना युजर आयडी आणि पासवर्ड दिले. सहा संशयितांना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनाविली. या गुंतागुंतीच्या घोटाळ्यामागील सूत्रधार दुबईत असल्याचे आढळले. ऑपरेशनमध्ये फसव्या कारवाया आणि दुबई ते चीनपर्यंत पसरलेल्या नेटवर्कमधील संबंध उघड झाला.
पार्टटाइम नोकरीची ऑफर देण्यात आली. टास्कमार्फत कार्य पूर्ण करण्यासाठी आणि मोबदला मिळविण्यासाठी महिलेला छोटी गुंतवणूक करण्यासही सांगितले.
तिने एकूण ३८ हजार रुपये गुंतविले, पण त्याचा परतावा मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने साकीनाका पोलिसांत धाव घेतली.