Join us

जातीच्या दाखल्या अभावी पालिकेतील 5 नगरसेवकांवर गंडांतराची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2019 9:04 PM

जातीच्या दाखल्याअभावी पालिकेतील 5 नगरसेवकांवर गंडांतर येण्याची शक्यता असून, उद्या 2 रोजी सकाळी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रणजित मोरे आणि भारती डांगरे यांचे खंडपीठ निकाल देणार आहे.

- मनोहर कुंभेजकरमुंबई- जातीच्या दाखल्याअभावी पालिकेतील 5 नगरसेवकांवर गंडांतर येण्याची शक्यता असून, उद्या 2 रोजी सकाळी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रणजित मोरे आणि भारती डांगरे यांचे खंडपीठ निकाल देणार आहे. त्यामुळे दुसऱ्या क्रमांकावरील शिवसेना 3, कॉंग्रेस 1 आणि समाजवादी 1 उमेदवारांना नगरसेवकपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे.

मुंबई महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक २८ मधील काँग्रेसचे नगरसेवक राजपती यादव, प्रभाग क्रमांक ६७ मधील भाजपाच्या नगरसेविका सुधा सिंग, प्रभाग क्रमांक ७६ मधील भाजपच्या नगरसेविका केशरबेन पटेल, प्रभाग क्रमांक ८१ मधील भाजपाचे नगरसेवक मुरजी पटेल, प्रभाग क्रमांक 90 मधील काँग्रेसच्या नगरसेविका ट्युलिप मिरांडा यांनी सादर केलेले जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने यापूर्वी फेटाळले होते. जात पडताळणी समितीच्या निर्णयाला या  नगरसेवकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

त्यामुळे दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या या पाच उमेदवारांना नवीन वर्षाची भेट मिळणार आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक 28-मध्ये एकनाथ हुंडारे (शिवसेना), प्रभाग क्रमांक 67 मध्ये प्राची परब ( शिवसेना), प्रभाग क्रमांक  -76 मध्ये नितीन बंडोपंत सलाग्रे ( काँग्रेस), प्रभाग क्रमांक  -81 मध्ये संदीप नाईक ( शिवसेना), प्रभाग क्रमांक 90 मष्ये बेनीडिट किणी ( समाजवादी पार्टी) यांना ही संधी मिळणार आहे. दरम्यान काँग्रेसच्या प्रभाग क्रमांक 32 च्या नगरसेविका स्टेफी किणी यांचे नगरसेवक पद गेल्या 18 डिसेंबरला मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केल होतेे. त्यामुळे दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या प्रभाग क्रमांक 32 च्या शिवसेनेच्या उमेदवार गीता किरण भंडारी यांना देखिल पालिकेत नगरसेवकपदाची संधी मिळणार आहे. सध्या मुंबई महापालिकेत शिवसेनेचे 93,भाजपा 85, काँग्रेस 31, राष्ट्रवादी काँग्रेस 9, समाजवादी 6, एमआयएम 2 आणि मनसे 1 असे नगरसेवकांचे  संख्याबळ आहे.

टॅग्स :मुंबई महानगरपालिका