पटसंख्येअभावी सात मराठी शाळांना टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 06:07 AM2018-01-29T06:07:12+5:302018-01-29T06:07:28+5:30
इंग्रजी शाळांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत असल्याने, मुंबई महापालिकेच्या ११ शाळांना टाळे लावण्याची वेळ आली आहे. यात ७पैकी ४ मराठी शाळांमध्ये एकही विद्यार्थी शिकत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे नियमानुसार या बंद शाळांच्या इमारतीत खासगी शाळांना मार्ग मोकळा होणार आहे.
मुंबई : इंग्रजी शाळांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत असल्याने, मुंबई महापालिकेच्या ११ शाळांना टाळे लावण्याची वेळ आली आहे. यात ७पैकी ४ मराठी शाळांमध्ये एकही विद्यार्थी शिकत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे नियमानुसार या बंद शाळांच्या इमारतीत खासगी शाळांना मार्ग मोकळा होणार आहे.
पालिकेच्या हिंदीव्यतिरिक्त सर्वच भाषिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. विशेषत: दक्षिण मुंबईत ही समस्या प्रकर्षाने समोर आली आहे. विद्यार्थीच नसल्याने शिक्षकांनाही बसून पगार द्यावा लागत असतो. त्यामुळे बंद होणाºया शाळा नजीकच्या दुसºया शाळेत विलीन करण्याचा मार्ग शिक्षण विभाग अवलंबत आहे. अशा ११ शाळांच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव शिक्षण समितीच्या पटलावर मंजुरीसाठी
येणार आहे.
यामध्ये ७ मराठी आणि इतर भाषेच्या ४ शाळाही विलीन करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. महापालिका प्रशासनाच्या खासगीकरणाच्या धोरणानुसार, बंद होणाºया शाळांच्या इमारतीत खासगी संस्थांमार्फत इंग्रजी शाळा सुरू होऊ शकते. मात्र, अद्याप हे धोरण पालिका महासभेपुढे प्रलंबित आहे, परंतु खासगी शाळांना परवानगी मिळाल्यास सीबीएससी, आयसीएससी अशा कोणत्याही बोर्डाच्या शाळा सुरू होण्याची शक्यता आहे.
बंद होणाºया शाळांची यादी
खंबाला हिल (मराठी)- मलबार हिल
भवानी शंकर रोड (मराठी)- दादर
कस्तुरबा गांधीनगर (मराठी)- वरळी
गणपतराव कदम मार्ग (तेलगू)- वरळी
गणपतराव मार्ग (मराठी)- वरळी
धारावी (तेलगू)
सायन कोळीवाडा (गुजराती)- शिव
सहकारनगर (मराठी)- वडाळा
चंडिका संस्थान (मराठी)- काळाचौकी
धोबीघाट (मराठी)- महालक्ष्मी
किंग्ज सर्कल (उर्दू)