नवी मुंबई : मागील वर्षभरात एनएमएमटीच्या अपघातांमध्ये घट झाली आहे. इतकेच नव्हे, तर रस्त्यात गाड्या नादुरुस्त होण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. एकूणच मागील वर्षभरात उपक्रमाने सेवासुधारणेवर भर दिल्याचे दिसून आले आहे.विविध कारणांमुळे एनएमएमटीची सेवा तोट्यात चालली आहे. तोटा कमी करून उपक्रमाचा कारभार लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीने व्यवस्थापनाने कंबर कसली आहे. याचाच परिणाम म्हणून मागील वर्षभरात एनएमएमटीच्या सेवेत अनेक सकारात्मक बदल झाले आहेत. यातील प्रमुख म्हणजे अपघातांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. २०१३ मध्ये एनएमएमटीच्या बसेसना एकूण २७७ अपघात झाले होते. यात मोठ्या स्वरूपाचे २० अपघात होते. त्यातुलनेत २०१४ मध्ये अपघातांची संख्या २५६ इतकी नोंदविण्यातआली. विशेष म्हणजे २०१२ मध्ये या अपघातांची संख्या ३४६ इतकी होती. यात २८ मोठे अपघात होते. तर या वर्षात एकूण पाच जणांचा अपघाती मृत्यू झाला होता. मागील दोन वर्षांच्या तुलनेत गेल्या वर्षभरात अपघातांच्या संख्येत घट झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.अपघाताला आळा घालण्याबरोबरच रस्त्यावर गाड्या बिघडण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. पूर्वी दिवसाला १५ ते २० गाड्या बिघडून रस्त्यावरच बंद पडत. आता हे प्रमाण आठवर आले आहे. तसेच इंधनाच्या बचतीबाबतही उपक्रमाने समाधानकारक प्रगती केली आहे. उपक्रमात सध्या १६१ सीएनजीवर तर २०० डिझेलवर चालणाऱ्या बसेस आहेत.पूर्वी १५,००० लटर डिझेल तर १२०० किलो सीएनजी लागायचे. आता हे प्रमाण अनुक्रमे १३,५०० लीटर आणि ११०० किलोवर आले आहे. एकूणच मागील काही महिन्यात इंधनात ८ ते १० टक्के बचत करण्यात व्यवस्थापनाला यश आले आहे.कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी गेल्या वर्षभरात विविध उपक्रम राबविण्यात आले. त्यासाठी वेळोवेळी प्रशिक्षण शिबिरे, मार्गदर्शन, आरोग्य शिबिराचे आयोजित करण्यात आली. अपघात टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांवर भर देण्यात आला. एकूणच उपक्रमाचा कारभार लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात आले. त्याचा परिणाम म्हणून उपक्रमाच्या कामकाजात अनेक सकारात्मक बदल घडून आल्याचे एनएमएमटीचे प्रभारी व्यवस्थापक शिरीष आरदवाड यांनी सांगितले.खारघर स्थानक ते कोपरा मार्गावर आजपासून एनएमएमटीपनवेल : खारघर रेल्वे स्थानक ते सेक्टर - १० कोपरा - खारघर मार्गावर १ मार्चपासून एनएमएमटीची बससेवा सुरू होत आहे. त्यामुळे नागरिकांत समाधानाचे वातावरण आहे. या मार्गावर ४९ क्र मांकाची बस धावणार आहे. नव्याने विकसित झालेल्या खारघर सेक्टर - १० ची लोकसंख्या दहा हजारांहून अधिक आहे. शिवाय कोपरा गावाचा या सेक्टरमध्ये समावेश होतो. परिसरातील नागरिकांना रेल्वे स्थानकाचे दोन किमी अंतर गाठण्यासाठी कसरत करावी लागत असे. परिसरात रिक्षा वेळेत मिळत नाही. याशिवाय दुसरे कोणतेही साधन नसल्याने रहिवासी सिटीझन फोरम आणि खारघर फोरमच्यावतीने एनएमएमटी प्रशासनाची भेट घेऊन बससेवा सुरू करण्याची मागणी केली होती. नागरिकांच्या मागणीची दखल घेऊन १ मार्चपासून या मार्गावर ४९ क्र मांकाची बस धावणार आहे, त्यामुळे परिसरातील नागरिकांत समाधानाचे वातावरण आहे. खारघर फोरमच्या लीना गरड म्हणाल्या, आम्ही प्रशासनाची भेट घेतली, तसेच आमदार प्रशांत ठाकूर यांनीही अधिकाऱ्यांशी संपर्कसाधून बस सुरू करण्याची मागणी केली होती, तर एनएमएमटी प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या मार्गावर दोन बस धावणार असून सकाळी १० वा.पासून सेवा सुरू होईल. (प्रतिनिधी)
एनएमएमटीच्या अपघातांत घट
By admin | Published: March 01, 2015 12:42 AM