कांदिवलीच्या ठाकूर कॉलेज संघाचे आव्हान संपुष्टात, सेंट अँथोनीज सेकंडरी स्कूलने ३-0 ने उडवला धुव्वा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 03:49 AM2018-01-02T03:49:59+5:302018-01-02T03:50:15+5:30
कांदिवलीच्या ठाकूर कॉलेज संघाला सलग दुस-या पराभवाचा सामना करावा लागल्याने युथ स्पोटर््स राष्ट्रीय फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेतून आपला गाशा गुंडाळावा लागला. शिलाँगच्या सेंट अँथोनीज सेकंडरी स्कूलविरुद्ध ०-३ असा पराभव पत्करावा लागल्याने ठाकूर संघाचे आव्हान संपुष्टात आले.
मुंबई : कांदिवलीच्या ठाकूर कॉलेज संघाला सलग दुस-या पराभवाचा सामना करावा लागल्याने युथ स्पोटर््स राष्ट्रीय फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेतून आपला गाशा गुंडाळावा लागला. शिलाँगच्या सेंट अँथोनीज सेकंडरी स्कूलविरुद्ध ०-३ असा पराभव पत्करावा लागल्याने ठाकूर संघाचे आव्हान संपुष्टात आले.
घणसोली येथील कॉर्पोरेट पार्क मैदानावर झालेल्या या सामन्यात सेंट अँथोनीजच्या भक्कम आणि आक्रमक खेळापुढे ठाकूर संघाचा निभाव लागला नाही. स्ट्रायकर मेवानपायनशंगेन सिनतीव याने सामन्यातील दोन गोल करताना ठाकूर संघाचा पराभव निश्चित केला. त्याने ३६व्या आणि ५७व्या मिनिटाला गोल करत सेंट अँथोनीज संघासाठी मोलाचे योगदान दिले. त्याचप्रमाणे अतिरिक्त वेळेत मिडफिल्डर जेम्स रायनटोंग याने गोल करत ठाकूर संघाचे आव्हान संपुष्टात आणले.
दरम्यान, स्पर्धेत धमाकेदार सुरुवात केलेल्या ठाकूर कॉलेजने सलामीला बंगळुरुच्या अल - अमीन प्री युनिव्हर्सिटी संघाचा ७-० असा फडशा पाडला होता. मात्र, यानंतर त्यांना कोलकाताच्या कापसदंगा सतीन सेन विद्यापीठ आणि सेंट अँथोनीज संघाकडून पराभूत व्हावे लागल्याने स्पर्धेबाहेरचा रस्ता पकडावा लागला.
ठाकूर संघाला यासह ‘ब’ गटात ३ गुणांसह तिसºया स्थानावर समाधान मानावे लागले. तसेच कापसदंगा (७) आणि सेंट अँथोनीज (६) यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय स्थान पटकावत उपांत्य फेरीत धडक मारली. दुसरीकडे, ‘अ’ गटातून चंदिगडच्या मिनर्व्हा पब्लिक स्कूल (९) आणि गोव्याच्या रोजरी हायर सेकंडरी स्कूल (६) यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.