मायानगरीवर सावट कायम...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 02:26 AM2017-11-26T02:26:49+5:302017-11-26T02:26:55+5:30

देशाला हादरवून टाकणा-या साखळी बॉम्बस्फोट मालिकेनंतर रेल्वे ब्लास्ट, झवेरी बाजार आणि २६/११ या दहशतवादी हल्ल्याने मायानगरी मुंबईवर दहशतवादाचे संकट कायम संकेत दिले आहेत.

Due to cloudburst ... | मायानगरीवर सावट कायम...

मायानगरीवर सावट कायम...

Next

- मनीषा म्हात्रे

देशाला हादरवून टाकणा-या साखळी बॉम्बस्फोट मालिकेनंतर रेल्वे ब्लास्ट, झवेरी बाजार आणि २६/११ या दहशतवादी हल्ल्याने मायानगरी मुंबईवर दहशतवादाचे संकट कायम संकेत दिले आहेत. दर हल्ल्यागणिक अतिरेकी अधिकाधिक अत्याधुनिक होत आहेत. त्या तुलनेत सुरक्षा व्यवस्थेत अधिक वाढ होणे गरजेचे असल्याचे ९ वर्षांनंतर जाणवते आहे.
२६/११ हल्ल्यात अतिरेक्यांनी ताज हॉटेल, हॉटेल ट्रायडंट, नरिमन हाउस, सीएसटी रेल्वे स्थानक, कामा हॉस्पिटल अशा दक्षिण मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांना टार्गेट केले होते. दक्षिण मुंबईतच महत्त्वपूर्ण ठिकाणांचा समावेश असल्याने या भागात सुरक्षा ठेवण्याची विशेष जबाबदारी आजही कायम आहे. मंत्रालय, विधान भवन, राज्य पोलीस मुख्यालय, पोलीस आयुक्तालय, बीएआरसी, परदेशी दूतावासाची कार्यालये, पालिका मुख्यालय, रेल्वे स्थानके, टर्मिनस, सिद्धिविनायक-महालक्ष्मी यांसारखी मोठी मंदिरे, मॉल्स, मार्केट अशी मुंबईमध्ये तब्बल २५०हून अधिक संवेदनशील ठिकाणे आहेत. यापैकी बरीच संवेदनशील आणि गर्दीची ठिकाणे अतिरेक्यांच्या टार्गेटवर आहेत.
मालवणी, कल्याणमधील मुले इसिसमध्ये सहभागी झाल्याची माहिती समोर येताच राज्यभरात इसिसच्या म्होरक्यांवर कारवाईचा सपाटा सुरू करण्यात आला. मुंब्रा, मुंबईतूनही इसिसच्या अतिरेक्यांना बेड्या ठोकण्यात आल्या. आयबीच्या अनुभवाचा फायदा घेत एटीएस प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनी राज्यभरात इसिसच्या म्होरक्यांच्या सुरू केलेल्या धरपकडीमुळे राज्यात इसिसला डोके वर काढता आले नाही. यापूर्वी २६/११च्या हल्ल्यानंतर राज्य दहशतवादविरोधी पथकाची धुरा सांभाळलेले तत्कालीन एटीएस प्रमुख राकेश मारिया यांनी इंडियन मुजाहीद्दिनचा कणा मोडून टाकला होता. गेल्या काही वर्षांत दहशतवादी संघटनांविरुद्ध राज्य दहशतवादविरोधी पथकाने उत्तर प्रदेश एटीएसच्या मदतीने कारवाईचा सपाटा लावला. याअंतर्गत अनेकांना बेड्या ठोकल्या. जिहादी विचारांनी माथी भडकलेल्या तरुणांना मुख्य प्रवाहात आणणे हे देशभरातील सुरक्षा यंत्रणांसमोरील मोठे आव्हान बनत चालले आहे. राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) हे आव्हान यशस्वीरीत्या पेलत गेल्या दोन वर्षांमध्ये तब्बल ६६ सुशिक्षित, उच्चशिक्षित तरुण-तरुणींना मुख्य प्रवाहात आणले आहे. २६/११च्या हल्ल्याला ९ वर्षे पूर्ण होत असताना आजही दहशतवादाचे सावट मुंबईवर कायम आहे. तपास यंत्रणा त्याला तोंड देण्यासाठी सज्ज आहेत. मात्र दहशतवाद्यांनी हल्ला चढविला तेव्हा ते पूर्ण तयारीत आले होते. त्या तयारीपुढे आपली यंत्रणा आणखी सक्षम होणे गरजेचे आहे.

नेहमी अलर्टवर
दहशतवादी कारवाया अथवा आपत्कालीन परिस्थितीत नेहमी तयार राहावे म्हणून फोर्स वन हे नेहमी अलर्टवर असते. त्यांचे एक पथक कार्यरत असते तर दुसरे पथक नेहमी सराव करीत असते. सकाळी ८ ते रात्री ८, रात्री ८ ते सकाळी ८ अशा दोन सत्रांमध्ये त्यांचे काम चालते. केंद्रातून एखादी सूचना येताच त्यासाठी त्यांचे पथक सज्ज असते.

व्हिडीओ शूटिंगसाठी बंदी...
मुंबई शहराच्या महत्त्वपूर्ण ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून व्हिडीओ शूटिंग करण्यास
बंदी करण्यात आली आहे.

प्रशिक्षणाची गरज...
सुरक्षा व संरक्षण विभागांतर्गत सुमारे 800 कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये विशेष सुरक्षा विभागातील अधिकाºयांना एक महिन्याचे पुण्यात प्रशिक्षण दिले जाते. याअंतर्गत पिस्तुलापासून एके-४७पर्यंतचे प्रशिक्षण मोलाचे ठरते. जेणेकरून कुठल्याही घटनेला तोंड देण्यासाठी ते तयार राहतात.
याच विभागातील अन्य शाखांमधील कर्मचारी वर्गाला हे प्रशिक्षण दिले
जात नाही.
पोलीस भरतीदरम्यान दिलेल्या प्रशिक्षणाच्या आधारावरच त्यांचे काम सुरू असते. अशावेळी यांनाही
हे प्रशिक्षण मिळाल्यास त्यांचाही उपयोग होऊ
शकतो, असे मत तेथील अधिकारी, कर्मचारी वर्गाचे आहे.

Web Title: Due to cloudburst ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई