पुलवामा हल्ल्यामुळे विमानतळ कर्मचाऱ्यांचा संप पुढे ढकलला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2019 06:29 AM2019-02-20T06:29:12+5:302019-02-20T06:29:32+5:30
संपाबाबत मुंबईतील एअरपोर्ट आॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या (एएआय) कार्यकारी संचालक कार्यालयातील कर्मचाºयांनी केलेल्या मतदानात तब्बल ९५ टक्के कर्मचाºयांनी संपाच्या बाजूने कौल दिला होता
मुंबई : देशातील ६ विमानतळांच्या खासगीकरणाच्या प्रस्तावाविरोधात एअरपोर्ट आॅथॉरिटी एम्प्लॉईज युनियनने संपाची नोटीस दिली होती. बुधवारपासून कर्मचारी व अधिकारी संपावर जाणार होते. मात्र पुलवामा हल्ल्यामुळे संपाऐवजी साखळी उपोषण २५ फेब्रुवारीपासून करण्यात येईल, अशी माहिती एअरपोर्ट आॅथॉरिटी एम्प्लॉईज युनियनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व पश्चिम विभागीय सचिव दीपक शिंदे यांनी दिली.
संपाबाबत मुंबईतील एअरपोर्ट आॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या (एएआय) कार्यकारी संचालक कार्यालयातील कर्मचाºयांनी केलेल्या मतदानात तब्बल ९५ टक्के कर्मचाºयांनी संपाच्या बाजूने कौल दिला होता. एअरपोर्ट आॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या ताब्यातील लखनऊ, हैदराबाद, जयपूर, मंगळुरू, गुवाहाटी व तिरुअनंतपुरम् या सहा विमानतळांच्या खासगीकरणाचा निर्णय सरकारने घेतला. त्याला एअरपोर्ट आॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या कर्मचाºयांचा व अधिकाºयांचा तीव्र विरोध आहे.