महाराष्ट्र बजेट 2020: मुद्रांक शुल्क सवलतीमुळे १८०० कोटी रुपयांची तूट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2020 05:56 AM2020-03-07T05:56:35+5:302020-03-07T05:56:50+5:30

बांधकाम व्यावसायिकांना अपेक्षित असलेली सवलत जाहीर झाली नसली तरी ‘हेही नसे थोडके ’म्हणत त्यांनी या घोषणेचे स्वागत केले आहे.

 Due to concession on stamp duty, deficit of Rs. 1800 crore | महाराष्ट्र बजेट 2020: मुद्रांक शुल्क सवलतीमुळे १८०० कोटी रुपयांची तूट

महाराष्ट्र बजेट 2020: मुद्रांक शुल्क सवलतीमुळे १८०० कोटी रुपयांची तूट

Next

मुंबई : गृहखरेदी करताना भराव्या लागणाऱ्या मुद्रांक शुल्कात एक टक्का सवलत अर्थमंत्री अजित पवार यांनी जाहीर केली असून त्यामुळे घरांच्या किमतीत नगण्य घट होईल आणि सरकारच्या तिजोरीतली आवक किमान १८०० कोटींनी कमी होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. बांधकाम व्यावसायिकांना अपेक्षित असलेली सवलत जाहीर झाली नसली तरी ‘हेही नसे थोडके ’म्हणत त्यांनी या घोषणेचे स्वागत केले आहे.
मंदीच्या फेºयात फसलेल्या बांधकाम व्यवसायाला मदतीचा हात देण्यासाठी मुद्रांक शुल्क पुढील पाच वर्षांसाठी एक टक्क्यापर्यंत कमी करावे, अशी प्रमुख मागणी बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. राज्याची अर्थव्यवस्था बिकट असताना ही मागणी मान्य करणे सरकारला शक्य नव्हते. तरीही अर्थमंत्र्यांनी एक टक्का सवलत जाहीर केली. मात्र, त्यामुळे ५० लाखांपर्यंतच्या घरांच्या किमती ४० ते ४५ हजारांनी तर, एक कोटीपर्यंतच्या घरांच्या किमतीवरील भार ८० ते ८५ हजारांनी कमी होईल. सवलत नगण्य असली तरी त्यामुळे बाजारात सकारात्मक वातावरण तयार होईल, विकासकांनी वेगवेगळ्या आॅफर्सच्या माध्यमातून किमती कमी केल्यास किमान पूर्ण झालेल्या इमारतींमधील घरांच्या विक्रीला चालना मिळू शकेल, अशी आशा बांधकाम व्यावसायिकांना आहे.
पाच टक्के मुद्रांक शुल्क, एक टक्का मेट्रो सेस आणि एक टक्का एलबीटी असा सात टक्के करभरणा मालमत्तांची नोंदणी करताना भरावा लागतो. त्यापोटी गेल्या वर्षी राज्याच्या तिजोरीत २९ हजार कोटी रुपये जमा झाले होते. मुंबई महानगर क्षेत्र आणि पुण्यासाठी एक टक्के सवलत लागू केल्याने त्यात १८०० कोटींची घट होईल असा अंदाज आहे. मात्र, गृहखरेदीला चालना मिळाली आणि व्यवहारांची संख्या वाढली तर ही तूट थोडीफार कमी करणे शक्य होईल, असे मतही व्यक्त केले जात आहे.
>गृहखरेदीला चालना - नयन शहा
मुद्रांक शुल्कात एक टक्का सवलत म्हणजे मध्यमवर्गीयांच्या गृहखरेदीला चालना आणि बांधकाम व्यावसायिकांना दिलासा देणारा हा निर्णय असल्याचे मत क्रेडाई-एमसीएचआयचे अध्यक्ष नयन शहा यांनी व्यक्त केले.

Web Title:  Due to concession on stamp duty, deficit of Rs. 1800 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.