कोरोनामुळे गणपती विसर्जन होणार सोसायटीच्या आवारातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:06 AM2021-09-19T04:06:43+5:302021-09-19T04:06:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अगदी दोन वर्षांपूर्वी अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जनासाठी मुंबईच्या चौपट्यांवर गर्दी होत असे. ...

Due to the corona, Ganpati will be immersed in the premises of the society | कोरोनामुळे गणपती विसर्जन होणार सोसायटीच्या आवारातच

कोरोनामुळे गणपती विसर्जन होणार सोसायटीच्या आवारातच

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अगदी दोन वर्षांपूर्वी अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जनासाठी मुंबईच्या चौपट्यांवर गर्दी

होत असे. गणपती विसर्जन मिरवणुका वाजत-गाजत विसर्जन स्थळी पोहोचत असत. हा विसर्जन सोहळा अगदी दुसऱ्या दिवशी पहाटे पाच-सहा पर्यंत चालत असे. मात्र, कोरोनाने सण उत्सवांचे स्वरूपच बदलले आहे. यावर्षी कोविड नियमांचे पालन करीत सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणाने साजरा केला जात आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही मुंबई महानगरपालिकेने २४ वॉर्डांमध्ये अनेक ठिकाणी कृत्रिम तलावांची चांगली व्यवस्था केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक गृहनिर्माण सोसायट्यांनी आपल्या सोसायटीच्या आवारातच कृत्रिम तलाव तयार केले आहेत. याच कृत्रिम तलावांमध्ये सार्वजनिक व घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन आज, रविवारी होणार आहे.

न्यू दिंडोशी एकदंत कॉप हौसिंग सोसायटी इमारत क्रमांक २०-२१ यांनी सोसायटीच्या आवारात मागील बाजूस उद्यानात कृत्रिम तलाव यंदाही तयार केला आहे. यंदा येथील रहिवासीयांच्या दीड, पाच दिवसांच्या घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन झाले. उद्याही सोसायटीच्या सार्वजनिक गणेश मूर्तींसह, घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन होणार आहे. न्यू दिंडोशी एकदंत कॉप हौसिंग सोसायटीचे अध्यक्ष सुभाष कुलकर्णी व सचिव समीर मसूरकर यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली.

पश्चिम उपनगरात अंधेरी पश्चिम येथील आझाद नगर सार्वजनिक उत्सव समितीचा अंधेरीचा राजा हा नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे. आझाद नगर क्रमांक २ मधील रहिवाशांच्या घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही अंधेरीच्या राजाच्या समोरील मैदानात खास कृत्रिम तलाव तयार करण्यात आला आहे, अशी माहिती आझाद नगर सार्वजनिक उत्सव समितीचे प्रमुख मार्गदर्शक व पालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष शैलेश फणसे यांनी ‘लोकमत’ला दिली.

वर्सोवा, यारी रोड येथील इनलॅक्स नगर या २८२ सदनिका असलेल्या सोसायटीत १९८४ पासून सार्वजनिक गणेशोत्सव उत्साहात करण्यात येतो. २०१९ पर्यंत वर्सोवा बीचवर येथील गणेश मूर्तींचे विसर्जन होत असे. मात्र, कोविडमुळे गेल्या वर्षीपासून येथील सार्वजनिक व घरगुती गणेश मूर्तींचे येथील इमारत क्रमांकडी समोरील उद्यानात तयार केलेल्या कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात येत असल्याचे या सोसायटीचे सचिव चंद्रमोहन सिंग खुशवा यांनी सांगितले.

Web Title: Due to the corona, Ganpati will be immersed in the premises of the society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.