कोरोनामुळे आता एमसीए सीईटी २८ एप्रिलऐवजी ३० एप्रिलला - उदय सामंत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 07:22 AM2020-03-20T07:22:47+5:302020-03-20T07:23:08+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांना आणि शैक्षणिक संस्थांना सुट्टी असताना २८ मार्च रोजी होणारी एमसीए अभ्यासक्रमाची सीईटीही सीईटी कक्षामार्फत तब्बल एक महिन्याने पुढे ढकलण्यात आली आहे.

Due to Corona, now MCA CET on April 7th instead of April 1st - Uday Samant | कोरोनामुळे आता एमसीए सीईटी २८ एप्रिलऐवजी ३० एप्रिलला - उदय सामंत

कोरोनामुळे आता एमसीए सीईटी २८ एप्रिलऐवजी ३० एप्रिलला - उदय सामंत

Next

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांना आणि शैक्षणिक संस्थांना सुट्टी असताना २८ मार्च रोजी होणारी एमसीए अभ्यासक्रमाची सीईटीही सीईटी कक्षामार्फत तब्बल एक महिन्याने पुढे ढकलण्यात आली आहे. ही सीईटी परीक्षा आता ३० एप्रिलला होणार असून, त्यासंदर्भातील परिपत्रक लवकरच संकेतस्थळावर टाकण्यात येणार असल्याची माहिती सीईटी सेलकडून देण्यात आली आहे.
सीईटी परीक्षेच्या वेळी परीक्षा केंद्र्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी होईल. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून हा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, अशी प्रतिक्रिया उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.
राज्यातील परिस्थिती पाहून ३१ मार्चनंतर एप्रिलमध्ये होणाऱ्या सीईटी परीक्षांबाबत सीईटी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी काळजी करू नये. शासनाला सहकार्य करावे आणि सर्वांनी कोरोनासंदर्भात स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन सामंत यांनी केले. १० जानेवारीपासून सुरू झालेल्या सीईटी नोंदणीला १८ हजार ५१३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमाची नोंदणी सुरू
एलएलबी ३ वर्षे सीईटी परीक्षेसाठी आॅनलाइन अर्ज नोंदणीची सुरुवात १९ मार्चपासून सुरुवात होत आहे. ही आॅनलाइन अर्जनोंदणीची प्रक्रिया ६ मे पर्यंत चालणार आहे. एलएलबी ३ वर्षे सीईटी परीक्षेसाठी हॉलतिकीट डाउनलोड करण्याची तारीख ६ जून असली तरी ती बदलण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तर या परीक्षेचा निकाल १४ जुलै रोजी लागण्याची शक्यताही संभाव्य वेळापत्रकात देण्यात आली आहे.
 

Web Title: Due to Corona, now MCA CET on April 7th instead of April 1st - Uday Samant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.