मृत्यू
मुंबईत गेल्या २४ तासांत दोन पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत गेल्या २४ तासांत दोन पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे मुंबई पोलीस दलातील कोरोनाबाधित पोलिसांच्या मृत्यूचा आकडा १०५ वर पोहोचला आहे.
राज्यभरात कोरोनामुळे ३९० हून अधिक पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या आठवड्यात राज्याच्या सायबर विभागातील पोलीस हवालदार हर्षल रोकडे (३६) यांचा कोरोनामुळे सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात मृत्यू झाला. १० एप्रिलपासून त्यांच्यावर लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणाही होत होती. दोन ते तीन दिवसांत रुग्णालयातून घरी सोडल्यानंतर लवकरच कामावर परतणाऱ असल्याचे त्यांनी सहकाऱ्यांना सांगितले हाेते. दरम्यान, शनिवारी त्यांची ऑक्सिजनची पातळी अचानक घसरली. त्यानंतर रविवारी त्यांचा मृत्यू झाल्याने सर्वांनाच धक्का बसला. त्यापाठोपाठ आता चुनाभट्टी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार रमेश सुरवसे आणि जे. जे. मार्ग पोलीस ठाण्याचे सुभाष जाधव यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
दरम्यान, पोलिसांनी कर्तव्यावर असताना स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी केले आहे. दुसरीकडे अपुरे मनुष्यबळ, पोलिसांवरील कामाचा वाढता ताण लक्षात घेता, स्थानिकांमधून विशेष पोलीस अधिकाऱ्यांची फाैजही पोलिसांच्या दिमतीला कार्यरत आहे.
..............................................