न्यायालयाच्या ताशे-यांमुळे गृहविभाग त्रस्त!, वरिष्ठ पोलीस अधिका-यांना दिली तंबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 12:48 AM2017-09-25T00:48:49+5:302017-09-25T00:48:57+5:30

वरिष्ठांकडून झालेल्या कथित अन्यायी कारवाईच्या विरोधात, पोलीस अधिकारी, कर्मचा-यांकडून महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणात (मॅट), तसेच नागरिकांकडून न्यायालयात दाखल करण्यात येणारे

 Due to the court orders, the home department got severely beaten to senior police officers | न्यायालयाच्या ताशे-यांमुळे गृहविभाग त्रस्त!, वरिष्ठ पोलीस अधिका-यांना दिली तंबी

न्यायालयाच्या ताशे-यांमुळे गृहविभाग त्रस्त!, वरिष्ठ पोलीस अधिका-यांना दिली तंबी

Next

जमीर काझी 
मुंबई : वरिष्ठांकडून झालेल्या कथित अन्यायी कारवाईच्या विरोधात, पोलीस अधिकारी, कर्मचा-यांकडून महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणात (मॅट), तसेच नागरिकांकडून न्यायालयात दाखल करण्यात येणारे खटले, वारंवारच्या दंडात्मक कारवाई व फटका-यांमुळे गृहविभाग त्रस्त झाला आहे. त्यामुळे यापुढे अशा प्रकरणात न्यायालयाने दिलेल्या निर्धारित मुदतीमध्ये, आवश्यक कागदपत्रे प्रतिज्ञापत्रासह आवश्यक बाबींची पूर्तता करण्याची खबरदारी, सर्व पोलीस घटक प्रमुखांनी घ्यावी, अशी तंबी राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाºयांना देण्यात आली आहे.
न्यायालयातील कामकाजासंबंधी मुख्य सादरकर्ता, सरकारी वकिलांच्या संपर्कात राहून, त्यांना आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता करण्याबाबत जबाबदार अधिकाºयांना सूचना द्याव्यात, असे पत्र महासंचालक सतीश माथुर यांनी राज्यातील सर्व पोलीस आयुक्त/अधीक्षक व विभागप्रमुखांना पाठविले आहे. गृहविभागाकडून आलेल्या निर्देशानंतर ही कार्यवाही करण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाºयांकडून सांगण्यात आले.
मॅट व न्यायालयाच्या विविध प्रकरणातील निकालाचा आढावा गृहविभागाकडून घेण्यात आला. त्यामध्ये बहुतांश खटल्यामध्ये पोलिसांकडून न्यायालयात निर्धारित मुदतीमध्ये योग्य प्रतिज्ञापत्र,
माहिती सादर न करणे, वरिष्ठ अधिकाºयांकडून त्याबाबत गाफिलपणा, बेफिकिरी दाखविण्यात आल्याने, निकाल विरोधात गेल्याचे आढळून आले.
त्यामुळे गृहसचिव सुधीर श्रीवास्तव यांनी पोलीस अधिकाºयांच्या बेजबाबदारपणामुळे शासनाची नाचक्की होत आहे. त्यामुळे या प्रकरणी योग्य ती कार्यवाही व खबरदारी घेण्याची सूचना पोलीस महासंचालकांना केली. ही बाब अपमानास्पद असल्याने, प्रत्येक घटक प्रमुखांनी त्याबाबत योग्य ती दक्षता बाळगून दाखल दावे, प्रलंबित खटले, न्यायप्रविष्ठ बाबींमध्ये योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.

Web Title:  Due to the court orders, the home department got severely beaten to senior police officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस