मुंबईच्या बाजारपेठेत आवक कमी झाल्याने शेतमालाचे दर वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 11:36 AM2019-01-08T11:36:51+5:302019-01-08T11:37:25+5:30
आवक कमी असल्याने शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळत आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक घटली आहे. रोज ५०० ते ७०० ट्रक, टेम्पोमधून सरासरी २ हजार टन भाजीपाला व ६ ते ७ लाख जुड्या पालेभाज्या विक्रीसाठी येतात. परंतु सोमवारी फक्त ३३० वाहनांची आवक झाली असून, १५०० टन भाजीपाला व ४ लाख जुड्या पालेभाज्यांची आवक झाली आहे.
आवक कमी असल्याने शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळत आहे. गत आठवड्यात १६ ते २० रुपये प्रतिकिलो विकल्या जाणाऱ्या दुधी भोपळ्याचे दर १४ ते २४ रुपये एवढे झाले आहेत. ढेमसे ३० ते ३५ वरून ५० ते ६० रुपये, फ्लॉवर १० ते १४ रुपयांवरून १४ ते १८ रुपये किलो दराने विकला जात आहे. गवार, घेवडा, शेवगा शेंग सर्वांचे दर वाढले आहेत. काकडीला १२ ते २६ रुपये दर मिळत आहे. कांद्याच्या दरामध्ये मात्र अद्याप सुधारणा नाही. ३ ते ९ रुपये किलो दराने कांद्याची विक्री होत आहे. मोसंबी, सफरचंद व संत्रीची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे.