उदासीनतेमुळे वेअर हाऊसची वाताहत

By admin | Published: December 10, 2014 12:34 AM2014-12-10T00:34:56+5:302014-12-10T00:34:56+5:30

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे कांदा मार्केटजवळील वेअर हाऊस वर्षभरापासून धूळ खात पडले आहे. वेअर हाऊसमधील शटरचे पत्रे व इतर भंगाराची चोरी होत आहे.

Due to depression warehouse collapse | उदासीनतेमुळे वेअर हाऊसची वाताहत

उदासीनतेमुळे वेअर हाऊसची वाताहत

Next
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे कांदा मार्केटजवळील वेअर हाऊस वर्षभरापासून धूळ खात पडले आहे. वेअर हाऊसमधील शटरचे पत्रे व इतर भंगाराची चोरी होत आहे.  मॅफ्को मार्केटजवळील भूखंडावरील कुंपणाच्या ताराही चोरीला गेल्या असून या मालमत्तांकडे बाजार समिती प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने वेअर हाऊसची वाताहत झाली आहे. 
कांदा- बटाटा मार्केटजवळ बाजार समितीच्या मालकीचे भव्य वेअर हाऊस आहे. कृषी मालाची साठवणूक करता यावी या उद्देशाने त्याची बांधणी करण्यात आली होती. बाजार समिती प्रशासनाने या मालमत्तेकडे कधीच गांभीर्याने लक्ष दिले नाही. अनेक वर्षे हे अल्प दराने भाडय़ाने देण्यात आले होते. प्रशासनाला या मालमत्तेचा विसर पडला होता. तीन वर्षापूर्वी शासनस्तरावर पाठपुरावा करून ते पुन्हा ताब्यात घेण्यात आले. काही दिवस निर्यातदारांना पॅकिंग करण्यासाठी ही जागा भाडय़ाने देण्यात आली होती. संबंधितांकडून अल्प भाडे मिळत होते.  निविदा काढून सदर जागा भाडय़ाने दिल्यास एपीएमसीला 4 ते 5 लाख रुपये मिळाले असते.  याविषयी तक्रार होऊ लागल्यानंतर वर्षभरापासून वेअर हाऊसचा वापर थांबविला. मात्र यामुळे वर्षभरापासून ही वास्तू धूळ खात पडून आहे. (प्रतिनिधी)
 
वापर नसल्याने प्रशासनाचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. येथील शटर तुटले आहेत. चार ते पाच शटरचे पत्रे या ठिकाणी ठेवण्यात आले आहेत. उर्वरित पत्रे चोरीला गेले आहेत. या ठिकाणी सुरक्षा रक्षक नसल्यामुळे मद्यपी व भिका:यांचा वावर या ठिकाणी वाढला आहे. 
बाजार समितीने मॅफ्को मार्केटच्या मागील बाजूचा भूखंड जवळपास 11 कोटी रुपयांना सिडकोकडून विकत घेतला आहे. या भूखंडावर कोल्ड स्टोरेज बांधण्याचा प्रस्ताव आहे. सदर भूखंड ताब्यात घेतल्यानंतर तेथे अतिक्रमण होवू नये यासाठी तारेचे कुंपण घालण्यात आले होते. सद्यस्थितीमध्ये कुंपणाच्या तारा चोरीला गेल्या आहेत. या भूखंडावर डेब्रिज टाकले जात आहे. येथील जुन्या वास्तूमध्ये भिकारी व इतरांनी आश्रय घेण्यास सुरूवात केली आहे. 
 
च्या दोन्ही वास्तूंकडे एपीएमसी प्रशासन दुर्लक्ष करत आहे. भंगार चोरीला गेल्याचीही माहिती प्रशासनास नाही. बाजार समिती मुख्यालयाला लागून या दोन्ही मालमत्ता आहेत. 
च्परंतु देखभाल शाखेचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत. अशीच स्थिती राहिली तर मुंबईतील शक्ती मिलप्रमाणो घटना या ठिकाणी होऊ शकते अशी भीती या परिसरातील व्यापारी व्यक्त करत आहेत. 
 

 

Web Title: Due to depression warehouse collapse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.