धारावी कोरोनामुक्तीच्या मार्गावर; सलग सहा दिवस शून्य बाधित, सध्या ११ सक्रिय रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 07:35 PM2021-12-21T19:35:37+5:302021-12-21T19:35:45+5:30

५७ टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण

Due to the Dharavi pattern, the spread of this large slum corona in Asia has come under complete control. | धारावी कोरोनामुक्तीच्या मार्गावर; सलग सहा दिवस शून्य बाधित, सध्या ११ सक्रिय रुग्ण

धारावी कोरोनामुक्तीच्या मार्गावर; सलग सहा दिवस शून्य बाधित, सध्या ११ सक्रिय रुग्ण

googlenewsNext

मुंबई - जागतिक स्तरावर गाजलेल्या धारावी पॅटर्नमुळे आशियातील या मोठ्या झोपडपट्टी कोरोनाचा प्रसार पूर्णपणे नियंत्रणात आला आहे. मागील सहा दिवस सलग येथे एकही बाधित रुग्ण सापडलेला नाही. तर मंगळवारी केवळ एका बाधित रुग्णाची नोंद झाली आहे. सध्या धारावीत केवळ ११ सक्रिय रुग्ण असल्याने हा परिसर कोरोनामुक्तीच्या मार्गावर आहे. कोरोनाच्या विळख्यातून या विभागाला मुक्त करण्यासाठी महापालिकेने घरोघरी जाऊन लसीकरण पूर्ण करण्यावर भर दिला आहे.  

कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीमध्ये कोरोनाचा उद्रेक होण्याची भीती व्यक्त होत होती. अडीच चौरस किलोमीटर परिसरात वसलेल्या धारावीमध्ये सात लाख लोकवस्ती आहे. दाटीवाटीने वसलेल्या या लोकवस्तीत कोरोनाचा प्रसार रोखण्याचे आव्हान होते. मात्र जास्तीजास्त लोकांची चाचणी, तात्काळ निदान, योग्य उपचार आणि नियमित निर्जंतुकीकरण हे सूत्र अवलंबिण्यात आले. त्यामुळे ऑक्टोबर २०२० मध्ये धारावीत कोरोनाच्या संसर्गाची साखळी तुटली. दुसऱ्या लाटेवेळी धारावीमधील इमारतींमध्ये बाधित रुग्णांची संख्या वाढली. त्यावेळेसही धारावी पॅटर्नचा प्रभाव कायम असल्याचे दिसून आले. 

मात्र कोविडचा नवीन प्रकार असलेल्या ओमायक्रॉनचा शिरकाव झाल्यानंतर एक बाधित रुग्ण धारावीतील रहिवाशी असल्याचे समोर आले. त्यामुळे पुन्हा चिंतेचे वातावरण पसरले, मात्र सुदैवीने या बाधित प्रवाशाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच त्याच्या संपर्कात असलेल्या दोन व्यक्तींचे कोविड चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने धारावीकरांना दिलासा मिळाला. मागील २१ दिवसांत १४ वेळा या भागात एकही नवीन बाधित रुग्ण आढळून आलेला नाही.

लसीकरणावर भर....

धारावीत सात लाख नागरिक राहतात. यापैकी १८ वर्षांवरील साडेचार लाख नागरिक लस घेण्यास पात्र आहेत. यापैकी ५७ टक्के रहिवाशांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. या परिसरात कारखाने व छोटे-छोटे उद्योग असल्याने या ठिकाणी बाहेरुन येणाऱ्या लोकांची संख्या अधिक आहे. यापैकी अनेकांकडे त्यांचे आधारकार्ड नसते, अशावेळी त्यांना लस देणे अवघड ठरत आहे. मात्र शंभर टक्के लसीकरण पूर्ण करण्यासाठी जी उत्तर विभागामार्फत घरोघरी जाऊन वंचित राहिलेल्या लोकांना डोस देण्यात येत आहे. 

धारावीतील ४५० सार्वजनिक शौचालयांचे दिवसातून तीनवेळा निर्जंतुकीकरण, कोविड चाचणीत वाढ आणि लसीकरणावर भर देण्यात आल्याने कोविडचा प्रसार येथे नियंत्रणात आहे. 
- किरण दिघावकर (सहायक आयुक्त, जी उत्तर विभाग )

Web Title: Due to the Dharavi pattern, the spread of this large slum corona in Asia has come under complete control.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.