दिवाळीनिमित्त एसटी महामंडळ तिकीट दरात करणार १० ते २० टक्के हंगामी भाडेवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 06:36 AM2017-09-18T06:36:19+5:302017-09-18T06:36:27+5:30

दिवाळीनिमित्त एसटी महामंडळाने तिकीट दरात १० ते २० टक्के हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. साधी, निमआराम, एशियाड, शिवनेरी अशा सर्व बस प्रवासात ही भाडेवाढ लागू करण्यात येणार आहे. हंगामानुसार भाडेवाढ करण्याचे विशेषाधिकार एसटी महामंडळाला आहेत. या अधिकारानुसार ही भाडेवाढ करण्यात आली आहे.

Due to Diwali, ST corporation fares 10 to 20 percent seasonal fare at a ticket price | दिवाळीनिमित्त एसटी महामंडळ तिकीट दरात करणार १० ते २० टक्के हंगामी भाडेवाढ

दिवाळीनिमित्त एसटी महामंडळ तिकीट दरात करणार १० ते २० टक्के हंगामी भाडेवाढ

Next


मुंबई : दिवाळीनिमित्त एसटी महामंडळाने तिकीट दरात १० ते २० टक्के हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. साधी, निमआराम, एशियाड, शिवनेरी अशा सर्व बस प्रवासात ही भाडेवाढ लागू करण्यात येणार आहे. हंगामानुसार भाडेवाढ करण्याचे विशेषाधिकार एसटी महामंडळाला आहेत. या अधिकारानुसार ही भाडेवाढ करण्यात आली आहे.
सणांच्या काळात प्रवास करणाºयांची संख्या लक्षणीय असते. या कालावधीचा फायदा घेण्यासाठी एसटी महामंडळाने सर्व प्रवासी गाड्यांमध्ये भाडेवाढ लागू केली आहे. १४ ते ३१ आॅक्टोबर दरम्यान ही भाडेवाढ करण्यात येणार आहे. १ नोव्हेंबरपासून जुन्या दराप्रमाणे तिकीट आकारले जाणार आहे, अशी माहिती एसटी महामंडळाच्या वतीने देण्यात आली. साध्या एसटीने प्रवास करणाºया प्रवाशांना १० टक्के, निमआराम बसने प्रवास करणाºयांना १५ आणि वातानुकूलित सेवेचा लाभ घेणाºया प्रवाशांना २० टक्के भाडेवाढीचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.
>तांत्रिक अडचणीवर मार्ग
एसटीच्या बसमध्ये खासगी कंपनीच्या यंत्राद्वारे तिकीट काढण्यात येते. यामुळे या मशीनमध्येदेखील तिकीट दरात बदल करण्यात येणार आहे. तांत्रिक अडचण येऊ नये यासाठी प्रमुख आगारांमध्ये कंपनीच्या अधिकाºयांची नेमणूक केली जाणार आहे.

Web Title: Due to Diwali, ST corporation fares 10 to 20 percent seasonal fare at a ticket price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.