दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुंबईच्या डबेवाल्यांंनी घेतला पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 06:04 AM2019-05-22T06:04:01+5:302019-05-22T06:04:02+5:30
लग्नाच्या वयात आलेल्या मुली आणि त्यांचे लग्न करण्यासाठी पदरी पैसा नसल्यामुळे वैफल्यग्रस्त होत ज्या शेतकºयांनी आत्महत्या केल्या त्यांच्या मुलींचा विवाह लावून देण्याचे शिवधनुष्य पेलण्यासाठी मुंबई डबेवाल्यांच्या शिष्टमंडळाने नुकतीच पुण्यात समितीच्या अध्यक्षांची भेट घेऊन मदत सुपुर्द केली.
मुंबई : यंदा राज्यातील बहुतांश भागात दुष्काळाच्या झळा बसत आहेत. यामुळे अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत. या शेतकऱ्यांच्या मदतीला मुंबईचे डबेवाले धावून आले आहेत. या शेतकºयांच्या मुला-मुलींच्या विवाहासाठी मुंबई डबेवाला संघटनेकडून आर्थिक मदत देण्यात आली आहे. नुकताच संघटनेच्या पदाधिकाºयांनी दुष्काळ निवारण समितीच्या अध्यक्ष अनिता दीक्षित यांच्याकडे २५ हजार रुपयांचा धनादेश सुपुर्द केला.
लग्नाच्या वयात आलेल्या मुली आणि त्यांचे लग्न करण्यासाठी पदरी पैसा नसल्यामुळे वैफल्यग्रस्त होत ज्या शेतकºयांनी आत्महत्या केल्या त्यांच्या मुलींचा विवाह लावून देण्याचे शिवधनुष्य पेलण्यासाठी मुंबई डबेवाल्यांच्या शिष्टमंडळाने नुकतीच पुण्यात समितीच्या अध्यक्षांची भेट घेऊन मदत सुपुर्द केली. याप्रसंगी अध्यक्ष उल्हास मुके, रामदास करवंदे, प्रवक्ते विनोद शेटे, विष्णू काळडोके उपस्थित होते. दुष्काळ निवारण समिती आणि मुंबई डबेवाला संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आत्महत्या केलेल्या शेतकºयांच्या मुला-मुलींचा सामुदायिक विवाह सोहळा इंदापूर, उस्मानाबाद येथे बुधवार, २९ मे रोजी पारंपरिक पद्धतीने पार पडणार आहे.