मुंबई : कर्तव्याववर असताना एपीआय सागर रामचंद्र खरे या अधिका-याचा हृदविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. खरे हे ३० वर्षांचे असून ऐरोली येथे वास्तव्यास होते. विक्रोळी पोलीस ठाण्यात अधिकारी कक्षात खरे कार्यरत होते. शुक्रवारी दुपारी ४.३० ते ४.४५ वाजेच्या दरम्यान पोलीस अधिकारी राणे हे कक्षात गेले त्या वेळी त्यांना खरे हे जमिनीवर पडलेले आढळले. राणे आणि अन्य सहका-यांनी खरे यांना तातडीने उपचारासाठी फोर्टिस रुग्णालयात दाखल केले; मात्र वैद्यकीय अधिकाºयांनी तपासणी करून दाखल करण्यापूर्वीच मयत घोषित केले.
गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबई पोलीस दलातील कर्तबगार पोलीस कर्मचारी संतोष एकनाथ शिंदे यांचा रस्त्यातील खड्ड्यांमुळे दुर्देवी मृत्यू झाला होता. ते 42 वर्षांचे होते. मागच्या आठवडयात गुरुवारी संतोष शिंदे यांच्या दुचाकीचा वाशी गाव सिंग्नल ब्रिजजवळच्या रस्त्यावर अपघात झाला होता. ते मुंबईहून नेरुळला चालले असताना मध्यरात्री दोनच्या सुमारास ही दुर्घटना घडली होती.
रस्त्यावरील खड्डे आणि तेथे असलेल्या अंधारामुळे शिंदे यांच्या दुचाकीला अपघात झाला होता. या अपघातात शिंदे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना लगेचच नजीकच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.