अतिक्रमणामुळे ओशिवरा नदीची गटारगंगा

By Admin | Published: June 14, 2014 02:25 AM2014-06-14T02:25:09+5:302014-06-14T02:25:09+5:30

ओशिवरा नदी ही अतिक्रमणाच्या विळख्यात सापडली असून, या नदीचे रूपांतर नाल्यात झाले आहे

Due to encroachment, the drainage of the Oshiwara river | अतिक्रमणामुळे ओशिवरा नदीची गटारगंगा

अतिक्रमणामुळे ओशिवरा नदीची गटारगंगा

googlenewsNext

मनोहर कुंभेजकर, मुंबई
एकेकाळी उपनगराची शान असलेली ओशिवरा नदी ही अतिक्रमणाच्या विळख्यात सापडली असून, या नदीचे रूपांतर नाल्यात
झाले आहे. वारंवार भरणी घालून उभ्या राहिलेल्या अनधिकृत झोपड्या हटवून, गाळ उपसून ही नदी पूर्ववत न केल्यास यंदाच्या पावसाळ्यात २६ जुलैची पुरावृत्ती होऊ शकते, अशी भीती जोगेश्वरी, मालाड आणि गोरेगाव भागातील रहिवासी व्यक्त करतात.
२६ जुलै २००५ रोजी शहरात उद्भवलेल्या पूरजन्य परिस्थितीचा मोठा फटका या तीन उपनगरांना बसला. पर्यायाने येथे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्त हानी झाली होती. त्या वेळीही ओशिवरा नदीचे पात्र वाढविले असते तर ही हानी झाली नसती, अशी ओरड झाली होती. मात्र त्याकडे मुंबई महापालिका प्रशासनाने कानाडोळा केल्याचा आरोप स्थानिक रहिवासी करतात.
सद्य:स्थितीत ओशिवरा नदीच्या काठावर झोपडपट्टी वसली आहे. बिल्डर, बांधकाम कंत्राटदार आणि भंगार व्यावसायिकांकडून
येथे भरणी घालून अनधिकृत बांधकामांचा सपाटा सुरूच आहे. ओशिवरा लिंक रोडच्या पूर्व आणि पश्चिम बाजूला एका बांधकाम व्यावसायिकाने एसआरएच्या नावाखाली सात इमारती बांधण्यासाठी नदीच्या पश्चिमेचा भाग आत घेऊन पात्राची रुंदी कमी करण्याचा प्रयत्न चालवला आहे. पुढे अतुल इंडस्ट्रीजच्या बाजूला असलेल्या तिवरांच्या झाडांची कत्तल करून त्या ठिकाणी बिल्डरने पायलिंगचे काम सुरू केले असून, खोटे लाभार्थी दाखवून या ठिकाणी एसआरए योजना राबविण्याचा प्रयत्न सुरू आहे. भगतसिंग नगर १, २ आणि लक्ष्मी नगर येथे नदीत मोठ्या प्रमाणावर भरणी घालून त्यावर झोपडपट्ट्या उभारल्या जात आहेत. या भरणीमुळे गेल्या अनेक वर्षांमध्ये पात्र अरुंद बनून नदीचे रूपांतर नाल्यात झाले आहे. येथील नागरिकांच्या वतीने नगरसेविका प्रमिला शिंदे यांनी पालिकेच्या संबंधित विभागांकडे पाठपुरावा सुरू केला आहे.

Web Title: Due to encroachment, the drainage of the Oshiwara river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.