Join us

वडिलांना त्रास देत असल्याने चुलत भावाला पेटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 5:30 AM

मुंबई : सुनील कातेले हा नेहमी आपल्या वडिलांना शिवीगाळ करीत होता. त्यामुळे बाटलीतून पेट्रोल आणून त्याला पेटविले, अशी कबुली त्याचा चुलत भाऊ संतोष कातेले याने बांगुरनगर पोलिसांकडे दिली आहे.

मुंबई : सुनील कातेले हा नेहमी आपल्या वडिलांना शिवीगाळ करीत होता. त्यामुळे बाटलीतून पेट्रोल आणून त्याला पेटविले, अशी कबुली त्याचा चुलत भाऊ संतोष कातेले याने बांगुरनगर पोलिसांकडे दिली आहे. दरम्यान, त्याला गुरुवारी न्यायालयात हजर केले असता ३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली.बुधवारी सकाळी संतोषने अपंग सुनीलला पेट्रोल ओतून जाळले. ९५ टक्के भाजलेल्या सुनीलचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. याबाबत पोलिसांनी सांगितले की, सुनील व संतोषच्या आजोबांना तीन मुले होती. बांगुरनगर परिसरात ‘एसआरए’ प्रकल्पांतर्गत मिळालेल्या चार फ्लॅटपैकी दोन त्यांनी दोन मुलांना दिले होते. तर दोन फ्लॅट सुनीलच्या वडिलांच्या नावावर केले होते. सुनीलच्या वडिलांनी त्यापैकी एक विकला होता. त्यांच्या निधनानंतर सुनील एकटाच त्या फ्लॅटमध्ये राहत होता. तळमजल्यावरील गॅलरीत गादीवर झोपायची सुनीलला सवय होती. त्याच्या शिवीगाळ करण्याच्या स्वभावामुळे संतोषच्या घरचे त्याला मारायला येतील अशी भीती त्याच्या भाच्याला होती. त्यामुळे त्याला नेहमी फ्लॅटमध्ये बंद करून तो बाहेर जात असे. संतोषला ते माहीत असल्याने बुधवारी सकाळी १० वाजता त्याने एका बाटलीतून पेट्रोल आणून सुनीलच्या अंगावर ओतले. वडिलांना शिवीगाळ करीत असल्याने मनात राग होता. त्याच रागात हे पाऊल उचलल्याची कबुली त्याने दिली.

टॅग्स :मृत्यू