कारवाईच्या भीतीने घरांची परस्पर विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 01:01 AM2018-10-29T01:01:10+5:302018-10-29T01:01:31+5:30

कांजूरमार्ग येथील अनधिकृत बांधकाम प्रकरण

Due to fear of action interaction of houses | कारवाईच्या भीतीने घरांची परस्पर विक्री

कारवाईच्या भीतीने घरांची परस्पर विक्री

Next

मुंबई : तोडक कारवाई केलेल्या ठिकाणी घरे उभारून त्यांची १७ लाखांत विक्री करणाऱ्या घरांवर रेल्वेसह संबंधित यंत्रणांचे लक्ष वेधले आहे. या घरांवर कारवाई होण्याच्या भीतीने भूमाफिया महिलेने रेल्वेच्याच अधिकाºयांकडे सेटिंग करण्यास सुरुवात केली आहे. तर ज्यांनी घरे खरेदी केले ते अन्य लोकांना घरे विकून तेथून पळण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र अद्याप प्रशासनाकडून ठोस पावले उचलण्यात आली नसल्याने स्थानिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहेत.

विक्रोळी पूर्वेकडील टागोरनगर ग्रुप क्रमांक ५ येथील अंबिका मित्र मंडळ परिसरात या झोपड्या उभारण्यात आल्या आहेत. कांजूर रेल्वे स्थानकातील फलाटाच्या विस्तारीकरणादरम्यान अडथळा ठरणाºया येथील १० झोपड्यांवर २००७ मध्ये प्रशासनाने तोडक कारवाई केली. तेथील रहिवाशांचे वाशी परिसरात पुनर्वसन केले.

त्यानंतर वर्षभराने येथे भूमाफिया महिलेने १० नव्या खोल्या उभारल्या. आणि १५ ते १७ लाखांत त्याची विक्री सुरू केली. यापैकी ६ खोल्यांची विक्री झाली. तर अन्य खोल्यांची विक्री सुरू आहे. लोकमतने याचा पर्दाफाश केल्यानंतर भूमाफिया महिलेने रेल्वेच्या अधिकाºयाला हाताशी धरून सेटिंग करण्यास सुरुवात केली आहे. तर स्थानिक लोकप्रतिनिधीही याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी याविरुद्ध काय पावले उचलतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तर याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती मध्य रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी एक.के. जैन यांनी सांगितले.

Web Title: Due to fear of action interaction of houses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई