Join us

काळबादेवीतील आग शॉर्टसर्किटमुळे

By admin | Published: May 26, 2015 12:41 AM

अग्निशमन दलाचा कणा मोडणाऱ्या काळबादेवी येथील गोकूळ निवास या इमारतीला लागलेल्या आगीचे कारण अखेर १५ दिवसांनंतर स्पष्ट झाले आहे़

मुंबई : अग्निशमन दलाचा कणा मोडणाऱ्या काळबादेवी येथील गोकूळ निवास या इमारतीला लागलेल्या आगीचे कारण अखेर १५ दिवसांनंतर स्पष्ट झाले आहे़ कोणताही पुरावा नसताना प्रथमदर्शींच्या जबाबावरून तयार केलेल्या प्राथमिक अहवालातून ही आग शॉर्टसर्किटमुळे झाल्याचे आज उजेडात आले़ या घटनेच्या सविस्तर चौकशी अहवालासाठी आणखी आठवड्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे़९ मे रोजी काळबादेवी येथील चार मजली गोकूळ निवासमध्ये आगीचा भडका उडाला़ या आगीतून रहिवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलास यश आले़ परंतु कमकुवत झालेली ही इमारत पाण्याच्या माऱ्याने कोसळली़ ज्यात अग्निशमन दलाचे वरिष्ठ अधिकारी गंभीर जखमी झाले़ यापैकी साहाय्यक विभागीय अधिकारी संजय राणे आणि भायखळा केंद्रप्रमुख महेंद्र देसाई जागीच मृत्युमुखी पडले़९० टक्के भाजलेले उपप्रमुख अग्निशमन अधिकारी सुधीर अमीन यांनी सहा दिवसांनी आणि अग्निशमन दलाचे प्रमुख सुनील नेसरीकर यांनी रविवारी ऐरोली येथील नॅशनल बर्न इन्स्टिट्यूटमध्ये अखेरचा श्वास घेतला़ अग्निशमन दलावरच आघात करणाऱ्या या दुर्घटनेची चौकशी गेले १५ दिवस सुरू आहे़ परंतु इमारत कोसळून तो ढिगाराही उपसण्यात आल्याने घटनास्थळी पुरावाच उरला नाही़ त्यामुळे चौकशी अहवाल गेले दोन आठवडे लांबणीवर पडला़ (प्रतिनिधी)असा तयार केला प्राथमिक अहवालच्घटनास्थळी घटनेची साक्ष देणारे पुरावे घटनाक्रम सांगत असतात़ परंतु या दुर्घटनेत पुरावाच उरलेला नाही़ त्यामुळे स्थानिक प्रत्यक्षदर्शी, अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांनी या आगीच्या केलेल्या नोंदी आणि वीजपुरवठा करणाऱ्या बेस्ट उपक्रमाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अहवाल तयार करण्यात आला आहे़अहवालात काय?च्प्रत्यक्षदर्शींचा जबाब, पोलिसांनी केलेला पंचनामा याच प्रमुख मानण्यात आल्या आहेत़ त्यानुसार शॉर्टसर्किटमुळेच या इमारतीला आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाने आपल्या अहवालातून समोर आणला आहे़ आग लागण्यापूर्वी इमारतीमध्ये बेस्टचा विद्युत पुरवठा सुरळीत सुरू होता, असेही नमूद करण्यात आले आहे़च्काळबादेवीतील आगीत होरपळल्याची बातमी कळताच दक्षिण आफ्रिकेतील घाना येथे कामास असलेले नेसरीकर यांचे लहान भाऊ हेमंत यांनी तत्काळ मुंबईला धाव घेतली. उपचारादरम्यान तब्बल १० दिवस आणि रात्र हेमंत रुग्णालयातच ठाण मांडून होते. अखेर प्रकृतीत थोडीफार सुधारणा होत असल्याने हेमंत पुन्हा घाना येथे गेले. दरम्यान, फोनवरून ते भावाच्या तब्येतीची विचारपूस करत होते. च्जखमी नेसरीकरांना भेटण्याची परवानगी कोणालाच नसली, तरी डॉक्टरांच्या माध्यमातून हेमंत नेसरीकर यांच्यासोबत संवाद साधत होते. मात्र रविवारी नेसरीकर यांची प्रकृती खालावली. अवघ्या १२ तासांत अवयव निकामी होण्यास सुरुवात झाली आणि वाढलेल्या संसर्गामुळे त्यांचा मृत्यू झाला. परिणामी भावासोबत प्रत्यक्ष बोलण्याची इच्छा अपूर्णच राहिल्याची खंत हेमंत यांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केली.मुलाच्या भविष्याची काळजीनेसरीकर यांचा मुलगा सिद्धांत याने नुकतीच बी टेकच्या दुसऱ्या वर्षाची परीक्षा दिली आहे. डिग्री पूर्ण करण्यासाठी त्याला आणखी दोन वर्षे शिक्षण घ्यावे लागणार आहे. त्यामुळे त्याच्या शिक्षणाची जबाबदारी पालिकेने उचलावी, असे आवाहन काही कुटुंबीयांनी केले आहे.अखेरच्या निरोपाला तोबा गर्दीच्नेसरीकर यांना अखेरचा निरोप देण्यासाठी अग्निशमन दलासोबतच पालिकेचे आजी-माजी अधिकारी आणि राजकीय व्यक्तींनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. त्यात आयुक्त अजय मेहता, पर्यावरण खात्याचे प्रधान सचिव सीताराम कुंटे, मनसे नेते बाळा नांदगावकर, नगरविकास खात्याच्या सचिव मनीषा म्हैसकर, पालिका गटनेते मनोज कोटक, रईस शेख, पालिका सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव आणि अन्य आजी-माजी अधिकारी व नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.‘असा चार्ज नको होता सुनील!’च्सुनील नेसरीकर यांच्या पश्चात प्रभारी प्रमुख अग्निशमन अधिकारी (सीएफओ) म्हणून प्रभात रहांदळे कामगिरी बजावत आहेत. नेसरीकर यांच्याबाबतची आठवण सांगताना रहांदळे म्हणाले की, एकाच वर्गातील असल्याने नेसरीकर यांनी नेहमीच एकेरी नावाने हाक मारण्याची अट घातली होती. शिवाय त्यांच्यानंतर सीएफओचा चार्ज मला मिळावा म्हणून सात वर्षे आधीच निवृत्ती घेण्याची तयारी दर्शवली होती. मात्र ‘अशा प्रकारे चार्ज नको होता सुनील’, असे म्हणताना रहांदळे यांना अश्रू अनावर झाले.