सलग सुट्ट्यांमुळे वाहतूककोंडीची प्रवाशांना भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 03:39 AM2018-01-26T03:39:01+5:302018-01-26T03:39:13+5:30

सलग सुट्ट्यांमुळे बाहेरगावी जाणा-यांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागणार आहे. प्रजासत्ताक दिनी शुक्रवार आणि रविवार साप्ताहिक सुट्टी आहे.

 Due to frequent vacations, traffic congestion fears | सलग सुट्ट्यांमुळे वाहतूककोंडीची प्रवाशांना भीती

सलग सुट्ट्यांमुळे वाहतूककोंडीची प्रवाशांना भीती

Next

मुंबई : सलग सुट्ट्यांमुळे बाहेरगावी जाणा-यांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागणार आहे. प्रजासत्ताक दिनी शुक्रवार आणि रविवार साप्ताहिक सुट्टी आहे. शनिवारी सुट्टी मंजूर झाल्यास नागरिकांना तीन दिवस सुट्टीचा आनंद घेता येईल. मात्र, यामुळे अनेकजण पर्यटनासाठी बाहेर पडणार असल्याने पर्यटकांना मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-नाशिक महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. तसेच मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरही प्रवास करताना प्रवाशांना ट्राफिक जामचा अनुभव येण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक नियोजनाचो आव्हान वाहतूक पोलिसांसमोर आहे.
दैनंदिन कार्यालयीन कामात व्यस्त असणारे अनकजण सलग सुट्ट्यांमुळे कुटुंबासाठी वेळ राखीव ठेवतात. अशा वेळी ‘दोन दिवसांची सहल आणि एक दिवस’आराम करत, पुन्हा कामावर रुजू होणे, असे वेळापत्रक साधारण सुट्ट्यांच्या कालावधीत असते. मात्र, शहरात विविध ठिकाणांसह मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर प्रवास करणे अवघड आहे. नाशिक, त्र्यंबकेश्वर आणि शिर्डी येथे जाणाºया भाविकांना कल्याण येथील विकासकामांमुळे विलंब होण्याची शक्यता आहे.

Web Title:  Due to frequent vacations, traffic congestion fears

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.