Join us

चांगल्या जलसाठ्यामुळे मुंबईत पाणीकपात नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 6:42 AM

या वर्षी मान्सूनचे आगमन लवकर होईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. मात्र, प्रत्यक्षात पावसाला विलंब झाला, तरी मुंबईकरांना यंदा टेन्शन घेण्याचे कारण नाही.

मुंबई : या वर्षी मान्सूनचे आगमन लवकर होईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. मात्र, प्रत्यक्षात पावसाला विलंब झाला, तरी मुंबईकरांना यंदा टेन्शन घेण्याचे कारण नाही. तलावांमध्ये अद्याप चांगला जलसाठा असल्याने, जून महिन्यात तरी पाण्याची चिंता नसल्याचे दिसते आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये चांगला जलसाठा असल्याने, पुढच्या महिन्याभरातही कोणतीच पाणीकपात केली जाणार नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.>३ लाख ६0 हजार दशलक्ष लीटर साठातलावांमध्ये सध्या तीन लाख ६० हजार दशलक्ष लीटर जलसाठा आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत तलावांमध्ये तीन लाख ६५ हजार दशलक्ष लीटर जलसाठा होता, तर अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा आणि मध्य वैतरणा तलावात सध्या २ लाख ७ हजार दशलक्ष लीटर जलसाठा आहे.

टॅग्स :मुंबईधरण